Thursday, April 23, 2026
Homeनाशिकबस व कारचा भीषण अपघात; तिघे जागीच ठार, एक बालक गंभीर जखमी

बस व कारचा भीषण अपघात; तिघे जागीच ठार, एक बालक गंभीर जखमी

नांदगाव । प्रतिनिधी

नांदगाव-संभाजीनगर रस्त्यावर गंगाधरी गावाजवळ मंगळवारी (१४) रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कार व बस यांच्यात झालेल्या अपघातात तीन जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. गंगाधरी गावाजवळील हॉटेल तेजस जवळ झाला हा भीषण अपघात झाला. यामध्ये ३ वर्षाचा मुलगा बचावला आहे. पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले आहे.

- Advertisement -

नाशिक येथून निकिता मनोज शिदे (२२), शुभम संतोष ललवाडे(२०), वंदना संतोष ललवाडे (४०), वेदांत मनोज शिंदे(३) हे कारने (क्र. एमएच १५ -सी. डी.(२०५७) भडगांव येथील विश्वानाथ फकिरा पाटील यांच्याकडे कार्यक्रमासाठी जात असतांना नांदगाव शहरालगत असलेल्या गंगाधरी शिवारात हॉटेल तेजस जवळ त्यांचा अपघात झाला.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, कारला समोरून आलेल्या चाळीसगाव -मनमाड बस (क्र. एम एच. १४- बी.टी. ४४९८ )ओव्हरटेक करीत असतांना जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा चक्काचुर झाला. या अपघातात निकिता मनोज शिदे,(२२) शुभम संतोष ललवाडे(२०), वंदना संतोष ललवाडे (४०) हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच सहा. पोलीस निरीक्षक सुनील बढे तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत केली..

ताज्या बातम्या

Crime News : युवकावर नालेगावात धारदार शस्त्राने हल्ला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरात नालेगाव परिसरातील जनकल्याण रक्तपेढीजवळ एका युवकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. करण दीपक लांडे (वय 21, रा. ठाणगे मळा, नालेगाव) असे...