Monday, October 26, 2026
Homeक्राईमCrime News : केडगाव बायपासवरून उचलले, मुळशीतील हॉटेलमध्ये डांबून ठेवले

Crime News : केडगाव बायपासवरून उचलले, मुळशीतील हॉटेलमध्ये डांबून ठेवले

जुन्या वाहनांच्या व्यवहाराच्या वादातून व्यावसायिकाचे अपहरण करून मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. युवराज रामचंद्र शेलार (रा. उरवडे, ता. मुळशी, जि. पुणे) आणि त्याचा भाऊ व पुतण्या यांनी संगनमताने हा प्रकार केल्याचा आरोप जखमी व्यावसायिक प्रज्वल सूर्यभान झावरे (रा. बोंद्रे, ता. पारनेर) याने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात केला आहे. झावरे यांच्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादी झावरे हे जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची युवराज शेलार याच्याशी ओळख झाली होती. झावरे यांनी शेलार यांच्या चार आयशर, तीन टाटा आणि एका अशोक लेलँड कंपनीच्या वाहनांचे व्यवहार कमिशन घेऊन करून दिले होते. या आठ वाहनांच्या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे झावरे यांनी जबाबात नमूद केले आहे. 18 ऑक्टोबर रोजी दुपारी झावरे हे केडगाव बायपासवरील हॉटेल के-9 येथून सर्व्हिस रोडने केडगावच्या दिशेने जात होते. त्यावेळी स्कॉर्पिओमधून युवराज शेलार, त्याचा भाऊ आणि पुतण्या तेथे आले.

शेलार याने झावरे यांचे दोन्ही हात पकडले, तर त्याच्या भावाने आणि पुतण्याने मारहाण करून स्कॉर्पिओमध्ये बसविले. मोबाईल काढून घेतला आणि तो बंद करण्यात आला. तसेच कारची चावी, घड्याळ आणि चांदीची अंगठीही काढून घेतल्याचे झावरे याने जबाबात म्हटले आहे. झावरे यांना स्कॉर्पिओमधून पुण्याच्या दिशेने नेत असताना, त्यांनी व्यवहार करून दिलेली आठ वाहने परत आणून देण्याची मागणी युवराज शेलार याने केली. संबंधित वाहने बोलावून घेण्याचा दबाव त्याच्यावर टाकण्यात आला. त्यानंतर न्हावरे फाटा परिसरातील करडे गावाजवळ त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

तेथून त्यांना हडपसर येथील एका चाळीत असलेल्या शेलार याच्या नातेवाइकाच्या घरी नेण्यात आले. तेथेही मारहाण करण्यात आली. यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांना मुळशी येथील सह्याद्री हॉटेलच्या खोलीत नेण्यात आले. तेथे त्याला डांबून ठेवत मारहाण केल्याचा आरोप आहे. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी झावरे यांना पुन्हा स्कॉर्पिओमधून मुळशी पॅटर्न हॉटेल येथे नेण्यात आले. हॉटेलच्या आवारातही आठ वाहने परत आणून देण्याची मागणी करत त्याला मारहाण करण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : आठवडाभर प्रचाराची रणधुमाळी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या जनरलच्या सहा जागा आणि सोसायटी मतदारसंघातील चार अशा दहा जागांसाठी येत्या 2 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील...