Friday, November 22, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra Governor : सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल; रमेश बैस यांची...

Maharashtra Governor : सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल; रमेश बैस यांची उचलबांगडी

हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती

नवी दिल्ली | New Delhi

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या (Governor) नियुक्त्या केल्या आहेत. यात महराष्ट्रातील राज्यपालांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी राष्ट्रपती मुर्मू यांनी नियुक्ती केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळाले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशिक-मुंबई महामार्गाची दुरावस्था; विविध संघटना रास्ता रोको करण्यावर ठाम

तर दुसरीकडे माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांची राजस्थानच्या (Rajasthan) राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.मध्यरात्रीनंतर १ वाजता राष्ट्रपती भवनाकडून यासंदर्भातील पत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकामध्ये एकूण १० राज्यांमधील राज्यपालांच्या बदल्या तसेच फेरनियुक्त्या करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच सदर नियुक्त्या या पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

हे देखील वाचा : “… तर राजकारणातून संन्यास घेईल”; प्रफुल्ल पटेलांचे मोठे विधान

कोण आहेत सीपी राधाकृष्णन?

६७ वर्षीय सी.पी. राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य असून ते मूळ तामिळनाडूचे आहेत. त्यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तिरुपूरमध्ये झाला. वयाच्या १६ व्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू केले. ते तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच राधाकृष्णन तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिले आहेत. राधाकृष्णन यांनी १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. तर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र,त्यांचा पराभव झाला होता.

हे देखील वाचा : अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

कोणकोणत्या राज्यांत नवीन राज्यपाल?

सी. पी. राधाकृष्णन – महाराष्ट्र
हरिभाऊ किसनराव बागडे – राजस्थान
संतोषकुमार गंगवार – झारखंड
रमण डेका – छत्तीसगड
सी. एच. विजयशंकर – मेघालय
ओमप्रकाश माथूर – सिक्किम
गुलाबचंद कटारिया – पंजाब, चंडीगड
लक्ष्मण प्रसाद आचार्य – आसाम, मणिपूर (अतिरिक्त कार्यभार)
जिष्णू देव वर्मा – तेलंगण
के. कैलाशनाथन – पुदुच्चेरी (उपराज्यपाल)

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या