Friday, October 11, 2024
Homeमुख्य बातम्याकॅलिफोर्नियाच्या युवकाला अशी मिळाली 'ऑनलाईन फारकत'

कॅलिफोर्नियाच्या युवकाला अशी मिळाली ‘ऑनलाईन फारकत’

नाशिक | प्रतिनिधी

प्रत्यक्ष न्यायालयात एकदाही हजर न राहता कॅलिफोर्निया येथील युवकाला येथील कौटुंबिक न्यायालयाने संमतीने फारकत दिली. ऑनलाईन पध्दतीने झालेला हा पहिलाच घटस्फोट असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

नाशिकमधील युवक विवाहानंतर नोकरीसाठी अमेरीकेतील कॅलिफोर्निया येथे पत्नीसह गेला होता. दोघांमध्ये वाद झाल्याने पत्नी भारतात परतली होती, तिने पुन्हा पतीकडे जाण्यास नकार दिला व घटस्फोटाचा अर्ज कौटुंबिक न्यायालयात दाखल केला.

पती कॅलिफोर्नियात असतांना अॅड धर्मेन्द्र चव्हाण यांच्यामार्फत वकिलपत्र दिले. दरम्यान दोघांमध्ये संगनमत होवून घटस्फोट घेण्याचे ठरले.

करोनामुळे हा व्यक्ती भारतात येवू शकत नव्हता, त्याने अमेरिकेतून प्रतिज्ञापत्र करुन पाठविले. त्याच्या वडिलांना मुखत्यारपत्र देण्यात आले. न्यायालयाने पतीस ऑनलाईन विचार करुन संमतीने घटस्फोट मंजूर केला.

कलिफोर्नियातील युवकातर्फे अॅड धर्मेन्द्र चव्हाण यांनी तर नाशकातील पत्नीतर्फे अॅड शाम गोसावी, अॅड दिनेश शिंदे यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या