Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यातिकीट दलालांविरुद्धची मोहीम तीव्र

तिकीट दलालांविरुद्धची मोहीम तीव्र

भुसावळ – Bhuasawal – प्रतिनिधी :

येथील मध्य रेल्वेच्या आरपीएफ ने आरक्षण तिकिटांच्या काळाबाजाराचा धोका रोखण्यासाठी दलालांविरूद्ध मोहीम अधिक तीव्र केली. रेल्वेने 12 मे 2020 पासून 15 वातानुकूलित विशेष गाड्या सुरू केल्या आणि त्यानंतर 1 जून पासून 100 गाडया सुरु केल्या आहेत. केली. यातील तिकिटात काळाबाजार होत असल्यामुळे आरपीएफने दलालांवर कारवाई सुरु केली असून आतापर्यंत 44 दलालांकडून 8 लाख 62 हजार 191 रुपयांची 479 तिकिटे जप्त केली आहे. ई-तिकिटांच्या काळाबाजाराबाबत प्रशासनाकडे तक्रारी येत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

लॉकडाऊन व अनलॉकच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने मुंबई विभागात 22 दलालांकडून 6 लाख 9 हजार 298 रुपयांची 328 ई-तिकिटे जप्त करण्यात आली. त्यांच्याविरूद्ध रेल्वे कायद्याच्या कलम 143 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या व्यतिरिक्त कोविड-19 साथीच्या काळात रेल्वेच्या सामाजिक जाणिवेच्या प्रत्येक बाबींमध्ये मध्य रेल्वे आरपीएफची टीम अग्रभागी कोरोना योद्धा म्हणून उभी राहिली आहे. रेल्वे मालमत्तेचे रक्षण, रेल्वेच्या आवारात आणि प्लॅटफॉर्मवर श्रमिकांच्या प्रवेशाचे नियमन आणि लॉकडाऊन दरम्यान अडकलेल्या प्रवाशांना अन्न पॅकेटचे वितरण केले आहे.

लहान मुलांची सुटका करून त्यांच्या कुटूंबियांशी पुन्हा भेट घालून देणे श्रमिक विशेष गाडीत ज्येष्ठ नागरिकांना किंवा अपंग प्रवाशांना ट्रेनमध्ये बसण्यास मदत करण्यासाठी, गर्भवती महिलांना वेळेवर वैद्यकीय सहाय्य करण्यासह ट्रेनमध्ये बसण्यास मदत केली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी सहकार्‍यांसाठी नाविन्यपूर्ण मास्कही त्यांनी तयार केले. गुन्हेगारांवर नजर ठेवून अंमली पदार्थ, ट्रेनमध्ये चोरलेले मोबाइल फोन इत्यादी जप्त करण्याचे काम ते चोखपणे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या