Thursday, May 2, 2024
Homeजळगावतृतीयपंथी उमेदवाराची औरंगाबाद खंडपीठात धाव

तृतीयपंथी उमेदवाराची औरंगाबाद खंडपीठात धाव

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्याने भादली बु. येथील इच्छुक तृतीयपंथी उमेदवार अंजली गुरू संजान यांनी नामांकन अर्ज वैध ठरविण्यात येवून निवडणूक लढविण्याची संधी द्यावी, या मागणीसाठी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात धाव घेतली आहे. या अर्जावर दि.4 जानेवारी रोजी सुनावणी करण्यात येणार असल्याचे तृतीयपंथी उमेदवाराने सांगितले.

- Advertisement -

जळगाव तालुक्यातील भादली बु. येथील वार्ड क्र. 5 मध्ये आरक्षण नसल्याने जनरल गटातून निवडणूक लढवू इच्छिणार्‍या अंजली पाटील उर्फ अजगर नामक तृतीयपंथी उमेदवारांने वार्ड क्र.5 मधून अर्ज दाखल केला होता. परंतु निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी अर्ज छाननी वेळेपर्यंत कोणतीही माहिती न देता स्त्री राखीव गटासाठी असलेला अर्ज म्हणून अंजली पाटील उर्फ अजगर या उमेदवाराचा अर्ज त्रुटी म्हणून बाद ठरविण्यात आला.

यावेळी आरक्षण जनरल असतांना ऐनवेळी स्त्री राखीव आरक्षण असल्याचे जाहीर करण्यात आले असल्याने सदर उमेदवाराने औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात निवडणूक उमेदवारी म्हणून संधी द्यावी. परंतु गावाच्या विकासासाठी निवडणूकच रद्द करावी, अशी मागणी मी करणार नसल्याचे अंजली गुरू संजान यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भादली येथील रहिवासी अंजली गुरू संजान यांच्या अर्जावर दि.4 जानेवारी रोजी सुनावणी होऊन निर्णय दिला जाणार असल्याचे भादली बु. गावाचे महिला पोलिस पाटील अ‍ॅड. राधिका ढाके यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या