शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
मंगळवारी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना शिर्डी पोलिसांनी (Shirdi Police) 14 लाखांचा गांजा, 12 लाखाची चारचाकी वाहन व मोबाईल असे एकूण 26 लाख 53 हजाराचा माल जप्त (Seized) करत गांजाची वाहतूक करणार्या व्यक्तींना ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे. शिर्डी परिसरात जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला (SP Rakesh Ola), अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी नाकाबंदी केली जाते. त्या अनुषंगाने मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास नगर-मनमाड रोडवर (Nagar-Manmad Road) असलेल्या सावळीविहीर फाटा या ठिकाणी उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे व पोलीस पथकाच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करत असताना रात्री 12.30 वाजता एका ग्रे रंगाची इनोव्हा कार क्रमांक एमएच 14 बीआर 7871 ही समृद्धी महामार्गावरून उतरुन कोपरगावच्या दिशेने शिर्डीकडे येत असताना तिची तपासणी केली.
तिच्या मागील डिक्कीत उग्र वास आल्याने खात्री केली असता 46 पाकिटात अंदाजे मिळून आला. गांजाची (Cannabis) किंमत 14 लाख 43 हजार असून चार चाकी वाहनाची किंमत 12 लाख रुपये व दहा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण 26 लाख 53 हजार 405 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा गांजा (Cannabis) अर्जुन धोंडीराम कांबळे, रा. निमगाव कोर्हाळे याच्याकडे मिळून आला. तो गांजा (Cannabis) कुठून आणला तसेच तो कोठे विक्री करणार होता. त्याबरोबर त्याला आणखी कोणी साथीदार आहे का याचा देखील आतिशय बारकाईने शोध सुरू आहे. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 677/2024 एन बी एस अक्ट कलम 8 क 2 (बी) (!!) (सी) अन्वये पोलीस कर्मचारी बाबासाहेब खेडकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाईत पोलीस कर्मचारी गजानन गायकवाड, गणेश घुले, केवल राजपूत, प्रसाद सुर्यवंशी यांनी भाग घेतला.