Tuesday, March 25, 2025
Homeनगरअपघात झालेल्या कारला भीषण आग

अपघात झालेल्या कारला भीषण आग

राहाता |वार्ताहर| Rahata

साकुरी (Sakuri) शिवरारात राहात्याकडे जाणार्‍या भरधाव वेगाने धावणार्‍या कारने (Car Accident) गुरुवारी रात्री हॉटेल गारवाच्या संरक्षण भिंतीला जोरदार धडक देऊन दोन पलट्या मारल्या होत्या अपघात झाल्यानंतर गाडीचे मोठ्या नुकसान झाल्याने सदर चार चाकी वाहन त्याच ठिकाणी उभे होते. शनिवारी दुपारी या कारला अचानक आग (Fire) लागली. नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ आग आग विझवली.

- Advertisement -

गुरुवारी रात्री शिर्डीकडून (Shirdi) राहात्याकडे भरधाव वेगाने जाणार्‍या एम .एच 20 डी. जे 2524 या होंडा कंपनीच्या कारने हॉटेल गारवाच्या संरक्षण भिंतीला जोरदार धडक देऊन दोन पलट्या खाल्ल्या या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला. चालकाचा ताबा सुटल्यामुळे अपघात घडला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. कारमध्ये राहाता (Rahata) शहरातील युवक व युवती होती. ते किरकोळ जखमी झाल्याने उपचारासाठी साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातात या वाहनाचा संपूर्णपणे चक्का चूर झाल्याने ते वाहन त्याच ठिकाणी उभे होते.

शनिवारी दुपारी हॉटेल समोर उभे असलेल्या या वाहनाने अचानक पेट (Car Fire) घेतल्याने राहता नगरपरिषदेचे अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांना घटनास्थळी जवून आग तात्काळ विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला असल्याचे नागरिकांनी सांगितले. अपघात झालेली गाडी उभी होती त्या ठिकाणी कचरा जाळल्यामुळे आग लागली अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. आग विझवण्यासाठी नगरपरिषदेचे अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रमोद बनकर, राजेंद्र गुंजाळ, अमोल बनसोडे, ऋषिकेश सदाफळ यांनी प्रयत्न केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...