Thursday, July 23, 2026
Homeनगरमद्यधुंद कार चालकाने चौघांना उडवले, एकाचा मृत्यू

मद्यधुंद कार चालकाने चौघांना उडवले, एकाचा मृत्यू

तिघे जखमी; मार्केटयार्ड परिसरातील घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील मार्केटयार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात भरधाव वेगात असलेल्या एका मद्यधुंद कार चालकाने चौघांना उडवले. एका चारचाकीसह काही दुचाकींनाही धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले आहेत. सोमवारी (25 नोव्हेंबर) सायंकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. कोतवाली पोलिसांनी या कारचा चालक राजू विठ्ठल खांडवे (रा. सांडवे, ता. नगर) याला ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

अपघातात रवींद्र रमेश कानडे (रा. कानडे मळा, सोलापूर रस्ता, अहिल्यानगर) हे मयत झाले आहेत. तर, रोहित संतोष मांजरे (रा. वृंदावन कॉलनी, अहिल्यानगर), जय अशोक जाधव (रा. पारगाव वाळूंज ता. नगर) व आसाराम तुळशीराम शिंदे (रा. कानडे मळा, सोलापूर रस्ता, अहिल्यानगर) हे तिघे जखमी झाले आहेत. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले चौकातील एका पानाच्या दुकानाजवळ चौघे उभे होते. यावेळी सहकार सभागृहाकडून येणार्‍या रस्त्यावरून एक कार (एमएच 16 बीझेड 2929) वेगात आली. काही कळायच्या आतच कारने एक दुचाकी व चौघांना उडवले. पुढे जाऊन कारचालकाने एका कारला धडक दिली. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

अपघाताची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप व माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन रूग्णालयात जखमींची चौकशी केली. कार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात एकाचा मृत्यू झाला असून मद्यधुंद कारचालकाला ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे निरीक्षक दराडे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : देशभरातील सायबर फसवणुकीचे अहिल्यानगर कनेक्शन उघड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांचे अहिल्यानगर कनेक्शन समोर आले आहे. अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्याने ‘म्युल अकाउंट’ रॅकेटविरोधात मोठी कारवाई सुरू केली असून,...