Monday, November 9, 2026
HomeनगरSoybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोयाबीनला (Soybean) जास्तीत जास्त 7040 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनची (Soybean) 46 क्विंटल ची आवक झाली. सोयाबीनला (Soybean) किमान 6900 रुपये, जास्तीत जास्त 7040 रुपये तर सरासरी 6975 रुपये भाव मिळाला. गव्हाची 3 क्विंटल ची आवक झाली. गव्हाला सरासरी 3000 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

सोमवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 1878 क्रेट्स ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 ते 175 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 130 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 90 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला. सीताफळाची 11 क्रेट्सची आवक झाली. सीताफळाला 10 ते 65 रुपये तर सरासरी 50 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. संत्रीच्या (Orange) 61 क्रेट्सची आवक झाली. संत्रीला 5 ते 28 रुपये तर सरासरी 20 रुपये किलोला भाव मिळाला. पेरू च्या 115 क्रेट्सची आवक झाली. पेरूला 10 ते 40 रुपये तर सरासरी 25 रुपये भाव मिळाला,अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

डाळिंब

शॉर्टसर्किटमुळे अग्नितांडवात डाळिंब बाग भस्मसात; लाखो रुपयांचे नुकसान

0
पिंपळदर | वार्ताहरयेथील पिंपळदर रस्त्यालगत असलेल्या डाळींब बागेला शॉर्टसर्किटमुळे आग लागून डाळींब बाग भस्मसात झाली. यात मोठ्या प्रमाणात झाडे जळाल्याने लाखो रूपयांची वित्तहानी झाली....