Thursday, March 13, 2025
Homeक्राईमचिंचवे गावाजवळ कारची स्कुलबसला धडक; एकाचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

चिंचवे गावाजवळ कारची स्कुलबसला धडक; एकाचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

दहिवड | वार्ताहर
सुसाट वेगात असलेल्या स्विप्ट कारने विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला पाठीमागुन जोरदार धडक दिली. या अपघातात १ जण ठार झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी धुळे येथे पाठवण्यात आले आहे. शुक्रवारी दि. ३१ जानेवारी रोजी हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चिंचवे गावाजवळ असलेल्या जिओ पेट्रोल पंपासमोर श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचार्यश्रम (जैन गुरूकुल) संचालीत स्वर्गीय श्री धनराज मिश्रालालजी भन्साळी इंगलिश मिडीयम स्कुलची बस क्रंमाक MH 15 AK 1679 मुलांना घेण्यासाठी मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला ऊभी होती. त्यावेळी पाठीमागुन सुसाट वेगात असलेल्या स्विप्ट कार क्रंमाक GJ 15 CJ 7303 कारने बसला पाठीमागुन जोरदार धडक दिली. हि धडक इतकी भिषण होती की कारचा अर्धा भाग बसच्या मागील टायर पर्यत दाबला गेला. त्यात कारचा चक्काचुर झाला. या वेळी बसमध्ये बसलेले विद्यार्थी थोडक्यात बचावले असुन सुदैवाने पुढील मोठा अनर्थ टळला. यावेळी अपघात झाल्याचे समजताच सोम कंपन्नीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या मदतीने अपघात ग्रस्त सदर वाहनाला बाहेर काढले. तसेच, परिसरातील नागरिकांनी जखमींना बाहेर काढत मदतकार्य करत जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या व सोमा कंपन्नीच्या रुग्ण वाहिकेतून पुढील उपचारासाठी चांदवड येथे रवाना केले.

- Advertisement -

दरम्यान, या अपघातातील मयत व्यक्ती बोरकुंड धुळे येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यातील जखींमपैकी एका जणाची प्रकृती चिंतजनक असल्याची माहीती मिळत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...