Saturday, September 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकारची काच फोडून रोकड लंपास

कारची काच फोडून रोकड लंपास

येवला | प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार्किंग केलेल्या बंद कारची काच फोडून चोरट्यांनी पाच लाख रुपयाची रोकड चोरली.

भास्कर वामन येवले (वय ५७) रा. कुसमडी, ता. येवला यांनी बडोदा बँक येवला येथुन चेकने ५ लाख रुपये काढून त्यांची कार (क्रमांक एच.२०- बी. वाय.- ९७०२) मधे ड्राव्हरशिटचे खाली पिशवीमध्ये गुंठाळुन ठेवले होते. त्यानंतर येवले बाजार समिती आवारात खरेदी विक्री संघ कार्यालयात गेले. या दरम्यान, अज्ञात चोरट्याने कारची पुढील डाव्या बाजुची काच फोडुन कारमध्ये ठेवलेले ५ लाख रुपये चोरुन नेले.

या प्रकरणी शहर पोलिसात येवले यांनी दिलेल्या फिर्यादी वरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार एम. व्ही ठाकरे , के. एस व्यापारे करीत आहेत.

ताज्या बातम्या

आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण नियोजनाची बैठक; माजी महापौर आणि आयुक्तांमध्ये शाब्दिक...

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या धर्म ध्वजारोहण आणि ग्राम परिक्रमेच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी (दि.१२) श्री शुक्ल यजूर्वेदिय ब्राह्मण संस्थेत रामसेतू पुलाजवळ बैठक आयोजित करण्यात...