Thursday, June 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबसमध्ये चढताना रोकड लंपास

बसमध्ये चढताना रोकड लंपास

- Advertisement -

सटाणा | प्रतिनिधी Satana

बसमध्ये चढतांना एका वृद्धाची एक लाख रूपये व महत्वाची कागदपत्र असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने लंपास केली. सटाणा बसस्थानकावर हा प्रकार घडला.

नानाभाऊ शंकर गायकवाड (७३ रा. विंचूरे) हे आपल्या गावी जाण्यासाठी बसमध्ये चढत होते. याच दरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील एक लाखाची रोकड तसेच बँकेचे पासबुक, चेकबुक असलेली पिशवी त्यांच्या नकळत लंपास केली. हा प्रकार लक्षात येताच गायकवाड यांनी सटाणा पोलिसात फिर्याद दिली.

पोलिसांनी अज्ञात चोरट़यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हवालदार टिळेकर हे तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : बनावट दूध प्रकरणात एका रात्रीत सात संशयित गजाआड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फक्राबाद (ता. जामखेड) येथे उघडकीस आलेल्या बनावट दूध निर्मिती प्रकरणाच्या तपासाला स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) नवे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी...