Monday, June 15, 2026
Homeक्राईमगोवंश जनावरांची दीड टन हाडे पकडली; गुन्हा दाखल

गोवंश जनावरांची दीड टन हाडे पकडली; गुन्हा दाखल

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथे सोमवारी सकाळी विनापरवाना बेकायदा गोवंश जनावरांची कत्तल (Cattle Slaughter) करुन या प्राण्यांची हाडे (Animal Bones) वाहतूक करताना पिकअप गाडी मिळून आली असून या गाडीतून दीड टन वजनाची हाडे जप्त (Bones Seized) करण्यात आली.

- Advertisement -

खडकाफाटा (Khadaka Phata) येथे सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच12 एसएफ8768) मध्ये गोवंश जनावरांची दीड टन वजनाची हाडे (Bones) आढळून आली. याबाबत अंकुश साहेबराव इटकर (वय 23) रा. जेऊरहैबती ता. नेवासा यांच्या फिर्यादीवरुन मोबीन जब्बार शेख (वय 55) रा. भारतनगर, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक श्री. लिपणे करत आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...