Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशभरदिवसा ४ बंदुकधाऱ्यांनी कार अडवून उद्योजकाला लुटलं, थरारक घटनेचा Video Viral

भरदिवसा ४ बंदुकधाऱ्यांनी कार अडवून उद्योजकाला लुटलं, थरारक घटनेचा Video Viral

दिल्ली | Delhi

- Advertisement -

दिल्लीत भरदिवसा चार चोरट्यांनी एका उद्योजकाला लुटल्याची घटना घडली आहे. भरसस्त्यात दिवसा कार अडवून बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी हा दरोडा टाकला असून ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Accident News : दोन बसेसचा भीषण अपघात! १२ जण ठार, ८ जखमी

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार एक डिलिव्हरी एजंट आणि त्याचा सहकारी कारने गुरुग्रामला जात असताना प्रगती मैदान बोगद्याजवळ पोहोचल्यावर अचानक दोन दुचाकी कारच्या समोर येऊन थांबल्या. त्यातील चार दरोडेखोरांपैकी एकाने बंदुकीच्या जोरावर कारच्या मागील सीटवरून बॅग काढली आणि चार जण पळून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. मात्र दरोडेखोरांच्या अटकेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने दिल्ली पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीच्या प्रगती मैदान बोगद्यातील दरोड्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

लळा असा लावावा की…! लाडक्या गुरूजींच्या बदलीने विद्यार्थीच नव्हे तर अख्खं गाव रडलं, भावूक करणारा VIDEO

- Advertisment -

ताज्या बातम्या