Friday, May 3, 2024
Homeनाशिकआठ दिवसात सीबीएससी नियुक्त्यांचा निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन छावा क्रांतीविर सेनेचा इशारा

आठ दिवसात सीबीएससी नियुक्त्यांचा निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन छावा क्रांतीविर सेनेचा इशारा

सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली गेल्याचे कारण सांगत या उमेदवारांच्या नियुक्त्या अडवून ठेवल्या आहेत. मा.न्यायालय सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीएससी प्रवर्गातुन निवड झालेल्या विद्यार्थ्यानां नियुक्त्या अडवण्याचा काही अधिकार्‍यांचा डाव असून, राज्य सरकारने येत्या आठ दिवसात उपोषणाला बसलेल्या आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांना तसेच साष्ट पिंपळगाव येथील मराठा समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष कॅबिनेट बैठक बोलवण्याची विनंती छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

सन 2019 मध्ये उपकेंद्र सहाय्यक या पदाची भरती निघाली होती सदरची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली असून, मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचे चिन्ह दिसत आहेत. या मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर अनेक दिवसापासून विद्यार्थी व साष्ट पिंपळगाव येथे समाजबांधव आंदोलन करीत आहे.

याबाबत राज्यशासन व केंद्र सरकार यांनी यावर तात्काळ निर्णय घेणे आवश्यक आहे. सीबीएससी प्रवर्गाला वगळुन नियुक्ती आदेश देण्याचे बोलले जातअसून, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना डावलून राज्य सरकारने ह्या नियुक्त्या जर केल्या तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज व सरकारमध्ये संघर्ष निर्माण हेईल जबाबदार राज्य सरकार व प्रशासकीय अधिकारी असतील असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या