Thursday, October 29, 2026
Homeदेश विदेशDA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ,...

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | New Delhi
केंद्र सरकारने १.१६ कोटी कर्मचारी-पेन्शनधारकांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केल्याने त्यांची दिवाळी आता गोड होणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ३ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिल्याचे २८ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या वृत्तांतून समोर आले आहे. या वाढीनंतर महागाई भत्ता ६० टक्क्यांवरून ६३ टक्क्यांवर जाणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात वाढ होणार असल्याने या निर्णयाकडे दिवाळीची भेट म्हणून पाहिले जात आहे.

या निर्णयाचा लाभ सुमारे ४८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे. या वाढीमुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला सुमारे १०,०१६ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार स्वीकारलेल्या सूत्राच्या आधारे ही वाढ मंजूर करण्यात आली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठे बदल; झिशान सिद्दीकी, उमेश पाटलांकडे सोपवली महत्वाची जबाबदारी

१ जुलैपासून DA ची वाढ लागू होणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीएची वाढ ही १ जुलैपासून लागू होणार आहे. याचाच अर्थ महागाई भत्ता ३ टक्के वाढला आहे ज्याचे पैसे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलै महिन्यापासून मिळणार आहे. पुढील महिन्यांत जो पगार जमा होणार आहे त्यात याचे एरियर्स मिळणार आहेत. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.

पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार?
DA आणि DR वाढल्यावर नेमका किती आर्थिक फायदा होणार, हे संबंधित कर्मचाऱ्याच्या बेसिक सॅलरीवर किंवा लागू पेन्शनवर अवलंबून असतं. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना किंवा पेन्शनधारकांना समान रक्कम मिळणार नाही.

ताज्या बातम्या

Nashik Trimbakeshwar News : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरात वाहतूक...

0
त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbhmela) ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी (दि.३१ ऑक्टोबर) रोजी...