Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामध्य रेल्वेची उत्कृष्ट कामगिरी; गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ

मध्य रेल्वेची उत्कृष्ट कामगिरी; गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

मध्य रेल्वेने (Central Railway) एप्रिल-सप्टेंबर २०२१-२२ मध्ये ३५.६ टक्क्यांहून अधिक मालवाहतूक केली आहे. मध्य रेल्वेत सप्टेंबरमध्ये झालेली मालवाहतूक (Freight) आतापर्यंतची सर्वात चांगली लोडिंग आहे. मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२१ मध्ये ५.४४ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे…

- Advertisement -

एप्रिल ते सप्टेंबर २०२१ कालावधीत मध्य रेल्वेने ३४.८५ दशलक्ष टन माल वाहतूक केली. जी मागील आर्थिक वर्षाच्या म्हणजेच २०२०-२१ मधील २५.७१ दशलक्ष टनांच्या तुलनेत ३५.६ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे.

एप्रिल-सप्टेंबर २०२१ या कालावधीत लोड होणाऱ्या प्रमुख वस्तूंमध्ये कोळसा १८.२४ दशलक्ष टन, कंटेनर ४.७९ दशलक्ष टन, सिमेंट ३.४७ दशलक्ष टन, लोह आणि स्टील १.४१ दशलक्ष टन, साखर १.०७ दशलक्ष टन, कांदा ०.५० दशलक्ष टन आणि ऑटोमोबाईल ०.२९ दशलक्ष टन यांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी (Anil Kumar Lahoti) म्हणाले की, रेल्वेने होणारी मालवाहतूक हा ग्राहकांसाठी उपलब्ध असलेली सुरक्षित, जलद आणि पर्यावरण अनुकूल पर्याय आहे.

मध्य रेल्वे महसूल (Revenue) वाढवण्यासाठी सर्व शक्य मार्ग शोधत आहे. पावसाळा असूनही मध्य रेल्वे टीमने मालवाहतूक लोडिंगला चालना देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आणि नवीन (माल) वाहतूक करण्यासाठी निवडला.

बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्स (बीडीयू) ने मुंबई विभागातून जिप्सम, अमोनिया गॅस, गॅल्वनाइज्ड स्टील कॉइल, मिल स्केल, कार्बन ब्लॅक फीड स्टॉक; नागपूर विभागातून नट कोक (मेटलर्जिकल कोक) गुरूमार्केट, पुणे विभागातून दर्शन, बांगलादेश करीता साखरेची पहिल्यांदाच वाहतूक केली आहे. अहमदनगर, सोलापूर विभागातून मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत प्रथमच खताची लोडिंग केली.

मध्य रेल्वेने जेएनपीटी येथून डीडब्लूएआरएफ कंटेनर ट्रेनचे लोडिंग सुरू केले आहे. ज्यामुळे दुहेरी स्टॅक केल्यावर व्हॉल्यूम वाढण्यास मदत होईल. यामुळे स्पर्धात्मक खर्चाचा फायदा आणि आंतरदेशीय रसद कमीत कमी खर्चात पुरवता येते.

सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबई विभागाने १.३३ दशलक्ष टन, तर भुसावळ विभागाने ०.५१ दशलक्ष टन, नागपूर विभागाने २.९६ दशलक्ष टन, पुणे ०.१७ दशलक्ष टन आणि सोलापूरने ०.४७ दशलक्ष टन लोडिंग साध्य केले आहे.

आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या सहामाहीत, मध्य रेल्वेच्या ३४.८५ दशलक्ष टन लोडिंग मध्ये मुंबई विभागातील ८.३० दशलक्ष टन, भुसावळ विभागातील २.८० दशलक्ष टन, नागपूर विभागातील १९.४९ दशलक्ष टन, पुणे विभागातील ०.८९ दशलक्ष टन आणि सोलापूर विभागातील ३.३७ दशलक्ष टन लोडिंगचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या