Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशPavel Durov Arrested : Telegram चे सीईओ पावेल ड्यूरोव यांना विमातळावर अटक,...

Pavel Durov Arrested : Telegram चे सीईओ पावेल ड्यूरोव यांना विमातळावर अटक, कारण काय?

दिल्ली । Delhi

अब्जाधीश म्हणून ओळख असलेले टेलिग्रामचे (Telegram) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO ) पावेल ड्युरोव (Pavel Durov) यांना २५ ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये अटक करण्यात आलं. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पावेल ड्यूरोव यांना कोणात्या कारणामुळे अटक करण्यात आली आहे, असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ड्यूरोव त्यांच्या खासगी जेटने अझरबैजानला जात होते. त्यावेळी पोलीस तपासाचा एक भाग म्हणून अटक वॉरंट जारी करत त्यांना अटक करण्यात आली. पॅरिसमधील बौरगेट विमानतळावर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. यावर टेलिग्रामने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच फ्रान्सचे गृह मंत्रालय आणि पोलिसांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हे हि वाचा : देशभरातील साखर उद्योगांकडून संयुक्त हरकत आराखड्याचा प्रयत्न

पावेल ड्युरोव कोण आहेत?

३९ वर्षीय पावेल ड्युरोव यांचा जन्म रशियात झाला. २०१३ साली त्यांनी टेलिग्रामची स्थापना केली होती. गोपनियता, एनक्रिप्शन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केल्यामुळे टेलिग्रामने अल्पावधितच चांगली लोकप्रियता मिळविली. २०१४ साली ड्युरोव यांना रशियातून बाहेर पडावे लागले होते.

हे हि वाचा : “फोडाफोडीच्या राजकारणास केवळ शरद पवार जबाबदार, जातीचं विषही…”; राज ठाकरेंनी डागली…

विरोधकांच्या अकाऊंटला टेलिग्रामवरून काढून टाकावे, अशी मागणी केल्यानंतर ड्युरोव यांनी त्यास विरोध दर्शविला होता. २०१७ साली ते दुबईत राहू लागले होते आणि २०२१ साली त्यांनी फ्रान्सचे नागरिकत्व स्वीकारले. नंतर रशियानेही टेलिग्रामवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला. रशियन भाषिक लोक मोठ्या प्रमाणावर टेलिग्राम वापरतात. याद्वारे युक्रेनमधील युद्धाची महत्त्वाची माहिती शेअर केली जात आहे.रशियन सैन्य संपर्कासाठी टेलिग्रामचा वापर करते, असेही म्हटले जाते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...