Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedमालेगावात अंत्ययात्रेसाठी गेलेले वाघळीतील सहा होम क्वारंटाईन

मालेगावात अंत्ययात्रेसाठी गेलेले वाघळीतील सहा होम क्वारंटाईन

चाळीसगाव – 

तालुक्यातील वाघळी येथील सहा जणांना मालेगाव येथे नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी जाणे चांगलेच महागात पडले आहे. दोन दिवसांपूर्वी अंत्ययात्रेसाठी गेलेल्या या सहा जणांना होम कारंटाईन करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे पुन्हा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्ययात्रेसाठी चाळीसगावातील एकाच परिवारातील पाच जण गेल्याच्या संशयावरुन चाळीसगावातील एका सोसायटीतील   सहा जणांना पोलिसांनी खबदारीसाठी गुरुवारी संकाळी ताब्यात घेवून, तपासणीसाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची घटना ताजी असताना, आता पुन्हा त्यांच दिवशी मालेगाव येथे एक नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी सहा जण गेल्याची माहिती समोर आली आहे.

परंतू हे सहा जण कुठल्याही कोरोना बांधित रुग्णांच्या अंत्ययात्रेसाठी गेलेले नव्हते. तर नात्याने जवाई लागत असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाच्या अंत्ययात्रेसाठी गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परंतू मालेगाव येथे दोन दिवसात तब्बल १० कोरोनाग्रस्त आढळे असून त्यातील एकाचा मृत्यू झाल्याने खबदारी म्हणून या सहा जणांना होम कारंटाईन करण्यात आले.

गावातील पोलीस पाटालांनी याबद्दलची माहिती मिळताच, त्यांनी पोलीस व तालुका वैद्यकिय आधिकारी यांना याबाबत माहिती देताच तालुका वैद्यकिय आधिकारी डॉ.डी.डी.लांडे यांनी त्यांच्या हातावर होम कारंटाईन शिक्के मारुन, १४ दिवस घरातच राहण्याचा सूचना दिल्याच माहिती डॉ.डी.डी.लांडे यांनी दिली आहे. तसेच सर्वांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या असून १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या