Monday, May 20, 2024
HomeजळगावVideo चाळीसगाव : तितुर व डोंगरी नदीला पूर

Video चाळीसगाव : तितुर व डोंगरी नदीला पूर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

परतीच्या पावसाने काल पाटणादेवी अभयारण्यातील (Patna Devi) डोंगराळ भागातील मोठा महादेव आणि परिसरात रात्रभर मुसळधार हजेरी लावल्याने आज पहाटे चाळीसगाव शहरातून वाहणार्‍या तितुर नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला. पुराच्या पाण्याने सकाळी सहा वाजता शहरातील भाजीपाला पूल आणि दयानंद कॉर्नर वरील पुलावर गुडघ्या एवढे पाणी चढल्याने नदी किनार्‍यावरील नागरिक आणि व्यापार्‍यात भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने पुरामुळेे कुठल्याही प्रकारची जीवत हानी झाली नाही. परंतू तरी देखील पुलावरील पाण्यातून लोक जीव धोक्यात घालून जाताना दिसत होते.

- Advertisement -

मागील वर्षी पावसाळ्यात गिरणा नदीला तब्बल सात महापुर आले होते. त्याचा जखम अजुनीह ताज्या आहेत. तसेच पुरग्रस्त शेतकर्‍यांना अजुनही भरपाई मिळालेली नाही. यंदाच्या पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. परंतू पुर आला नव्हता, परंतू परतीच्या जोरदार पावसामुळे तितुर व डोगरील नदीला शुक्रवारी पहाटे पुर आला. पुरामुळे शहरातून जाणारे पुर पाण्याखाली गेल्याने जुन्या व नव्या गावाचा संपर्क तुटला होता.

तर शेतकर्‍यांना देखील शेतमाल नेता आला नाही. अचानक आलेल्या पुरामुळे शेतकरी व सर्वसामान्याची एकच धावपळ उडली. तर जिल्ह्याला याआधीच दोन दिवसासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. परतीच्या या पावसाने शेतकर्‍यांच्या शेतातील कापसाच्या झाडावरील फुटलेल्या कापसाचे नूकसान झाले आहे. शेतकरी वर्ग आधीच मागील महिन्यात झालेल्या जास्तीच्या पावसाने होरपळून निघाला आहे.

जास्तीच्या पावसामुळे शेतमालाचे झालेले नुकसान भरपाईसाठी गेल्या आठवड्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहशील कार्यालयावर मोर्चा काढला असताना. आता परतीच्या पावसाने हाती येणारे जे काही असेल ते देखील कालच्या पावसाने हिरावून घेतल्याने शेतकर्‍यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. आजही दुपारी पासून तालुक्यात पाऊस सुरु झाला असून रात्री जोरदार पाऊस पडण्याची शक्यत वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांन सर्तक राहण्याच्या सूचना प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत.

गिरणा मन्याड धरणातील पाण्याचा विसर्ग वाढला

नाशिक जिल्ह्याच्या गिरणा आणि मन्याड धरण क्षेत्रावरील भागात देखील पाऊस झाल्याने, आज पहाटे गिरणा धरणातून ५००० तर मन्याड धरणातून २५०० क्युसेस असा एकूण साडेसात हजार क्युशेस पाण्याचा विसर्ग धरणाखालील गिरणा पात्रातून वाहत आहे. त्यामुळे गिरणीला पुन्हा पूर आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या