Sunday, May 5, 2024
Homeनगरचांदा ग्रामपंचायतीची निवडणूक ठरणार लक्षवेधी

चांदा ग्रामपंचायतीची निवडणूक ठरणार लक्षवेधी

चांदा | Chanda

नेवासा तालुक्यातील राजकीय क्षेत्रात जागृत आणि बहूचर्चित म्हणून प्रसिद्ध असलेल्या चांदा ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून

- Advertisement -

येत्या बुधवार दि. 23 पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याने थंडीतही राजकिय वातावरण तापले आहे. 15 जानेवारीला मतदान होणार असल्याने गुप्त बैठकांना चांगलाच वेग आला आहे

चांदा ग्रामपंचायतीच्या एकूण सतरा जागा असून सद्यस्थितीत ग्रामपंचायत जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख गटाच्या ताब्यात आहे. सर्व जागांचे प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध झाले आहे. प्रभाग तीनमध्ये दोन उमेदवार वगळता इतर पाच प्रभागांत तीन उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत.

गावची एकूण मतदार संख्या आठ हजार चारशे अठ्ठाण्णव असून मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा नवीन मतदार वाढले आहेत. प्रभागनिहाय सदस्य संख्या व आरक्षण मतदार खालीलप्रमाणे आहेत.

प्रभाग क्रमांक 1- एकूण मतदार 1515 (पुरुष 793, महिला 722) सर्वसाधारण एक व सर्वसाधारण स्त्री दोन.

प्रभाग दोन मध्ये 1413 मतदार (पुरुष 789, महिला 624) आहेत. सर्वसाधारण व्यक्ती, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री व सर्वसाधारण स्त्री अशा जागा आहेत.

प्रभाग तीन मध्ये 1329 मतदार (पुरुष 737, महिला 592) आहेत. प्रभागात यावेळी दोनच जागा असून त्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण स्त्री अशा जागा आहेत.

प्रभाग 4 मध्ये 1026 मतदार (पुरुष 577, महिला 449) आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण व्यक्ती व सर्वसाधारण स्त्री अशा जागा आहेत.

प्रभाग 5 मध्ये 1554 मतदार (पुरुष 807, स्त्री 747) आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती व्यक्ती, सर्वसाधारण व्यक्ती व नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री अशा तीन जागा आहेत.

प्रभाग 6 मध्ये 1621 मतदार (पुरुष 854, महिला 767) आहेत. यामध्ये सर्वसाधारण व्यक्ती, अनुसूचित जाती स्त्री व नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री अशा जागा आहेत.

अशा प्रकारे सर्व सहाही प्रभागात आरक्षण आणि मतदार संख्या असून आता येत्या बुधवारपासून रणसंग्राम सुरू होत आहे. फार्म भरण्याची अंतिम दिनांक 30 डिसेंबर असून 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत 4 जानेवारी असून 15 जानेवारीला मतदान तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

राजकियदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या चांदा ग्रामपंचायत निवडणूक तालुक्यात लक्षवेधी ठरणार असून त्यादृष्टीने राजकिय मंथन सुरू झाले आहे. गुप्त बैठका सुरू असून राजकिय डावपेच कसे आखले जाणार हे पुढील आठवड्यात स्पष्ट होणार आहे. थंडीच्या कडाक्यातही राजकिय धुराळा चांगलाच उडणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या