बीड । Beed
बीडमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याकडून अनेक गंभीर आरोप केले जात आहेत.
सुरेश धस यांनी बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख करत अनेक अभिनेत्रींचीही नाव घेतली. यात अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) नावाचाही समावेश आहे. सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. आता मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सुरेश धस यांना खडेबोल सुनावले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य आणि त्यांच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमी काळजी घेतली. राजकीय वाद सुरू आहे. यामध्ये काही प्रमाणात सामाजिक आणि संवेदनशील बाबदेखील आहे. पण, यामध्ये अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाहीत, असेही सुरेश धस यांनी खडसावले.
सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये. प्राजक्ता माळी यांनी देखील काल प्रेस घेऊन आपल्या भावना व्यक्त केला आहेत. पक्षाचे आमदार असून देखील तुम्ही असं काम करत आहे, असे तुम्ही करू नये. मी सुरेश धस यांना स्वतः विनंती करणार आहे पार्टीचा आमदार असून देखील तुम्ही असं काम करत आहे, हे तुम्ही असं करू नये असे धस यांना सांगणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आपण सुरेश धस यांना फोन करणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.