Thursday, January 8, 2026
Homeजळगावरावेर, बोदवड तालुक्यात चंद्रकांत पाटील यांचे पुष्पवर्षावाने स्वागत

रावेर, बोदवड तालुक्यात चंद्रकांत पाटील यांचे पुष्पवर्षावाने स्वागत

मुक्ताईनगर| प्रतिनिधी

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील रावेर व बोदवड तालुक्यात दि. १० रोजी दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांचा प्रचार दौरा पार पडला.

- Advertisement -

या प्रचारास मतदारसंघातील नागरिक आमदार चंद्रकांत पाटील यांचेवर ठिकठिकाणी पुष्प वर्षाव करून स्वागत करीत आहेत अशा प्रमाणे दिवसेंदिवस प्रचाराची रणधुमाळी सुरू असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला जात आहे.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील रावेर तालुक्यातील खिर्डी बु. , खिर्डी खु. , वाघाडी या गावामध्ये प्रचार दौरा पार पडला. त्याला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी महिलांतर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांचे औक्षण केले जात आहे व विजयासाठी प्रार्थना करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
त्याचप्रमाणे काल दिनांक १० नोव्हेंबर रोजी बोदवड तालुक्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील बोदवड तालुक्यातील सुरवाडे खुर्द येथे मुक्ताईनगर विधानसभेचे उमेदवार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा आयोजित केली होती.

YouTube video player

सभेला उपस्थित डॉ. उद्धव दादा पाटील मा. जि. प. सदस्य, महाजन सर शिवसेना जिल्हा प्रमुख, प्रा. हितेश दादा पाटील शिवसेना क्षेत्र प्रमुख, प्रमोद भाऊ धामोळे शिवसेना तालुका प्रमुख, अमोल दादा देशमुख भाजपा कार्यकर्ते, सुभाष दादा देवकर सरपंच मनूर, ग्रा.पं. सदस्य सुरवाडे बु.गणेश दादा पाटील तसेच बोदवड तालुका व साळसिंगी गनातील महायुती मधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....