Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedचाळीसगाव : भाजी विक्रेत्यांच्या जागेत बदल

चाळीसगाव : भाजी विक्रेत्यांच्या जागेत बदल

चाळीसगाव – 

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तरी देखील चाळीसगावात शासनाच्या नियमांचे उल्लघन करुन लोक रस्त्यावर भाजी घेण्यासाठी गर्दी करीत असतात. चाळीसगावातील भाजी घेणार्‍यांची गर्दी पाहता प्रातांधिकार्‍यांकडून भाजी विक्रेत्यांच्या जागेत बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

या आदेशात म्हटले आहे की, कोरोणा आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजिन ठिकाणी गर्दी होवून नये, म्हणून संपूर्ण देशात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्याधिकार्‍यांनी सार्वजनीक ठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच अनुषंगाने चाळीसगाव शहरात भाजीपाला व फळे घेण्यासाठी अनावश्यक गर्दी होवू नये, यासाठी खरबदारीच्या उपयायोजना म्हणून प्रातांधिकारी लक्ष्मीकांत सांताळकर यांनी हे आदेश दिले आहेत.

भाजी विक्रेत्यांसाठी नवीन जागा

शिवाजी घाटावरील सर्व दुकानासाठी, आता बलराम व्यायाम शाळेच्या पटागंण. आर्योपहार जवळील सर्व दुकाने आता लक्ष्मीनगर मधील डॉ.देवरे यांचे हॉस्पीटल जवळील सिताराम पहेलवान यांच्या मळ्यात. बस स्थानक जवळील सर्व दुकाने तसेच सिग्नल पॉईट ते तहसील कार्यालय रस्त्यावरील सर्व फळविक्रीची दुकाने, आता राष्ट्रीय महाविद्याल ग्राऊंडवर भरतील. तसेच अभिनव शाळेसमोरील सर्व दुकाने शेजवळकर नगर जवळील हमुमान मंदिर परिसराताली मोकळ्या जागेत भरविण्याचे आदेश प्रातांधिकार्‍यांनी दिले आहेत.

वरील जागेवर फळ व भाजीपाला विक्री दुकानात सुरक्षीत अंतर असावे ग्राहकांची गर्दी होणार नाही. तसेच सुरक्षीत अंतरासाठी आवश्यक त्या खुणा आखाव्यात तसेच कोरोणा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी इतर आवश्यक ती खबरदारी घ्यावी. यासंदर्भीत अध्यक्ष भाजीपाला व फ्रुट विक्रेता असोसिएशन चाळीसगव यांनी संबंधीत विक्रेत्यांना आवश्यक त्या सूचना कराव्यात.

या व्यतिरिक्त ज्या विक्रेत्यांना हातागाडीवरुन भाजीपाला विक्री करावयाची आहे. त्यांनी कॉलनी परिसर व इतर रहीवासी परिसरात फिरस्ती स्वरुपात भाजी विक्री करावी. वरील सूचनांचे तंतोतंन पालन करावे. आदेश ठरवून दिलेल्या जागे व्यतिरिक्त इतर ठिकाणी एकाजागेवर बसून हातगाडी लावून भाजीपाला व फळे विकण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

या संदर्भात हलगर्जीपणा आढळुन आल्यास संबंधीविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीनूसार कारवाई करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या