Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमShevgav : स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून चार लाखांना गंडा

Shevgav : स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून चार लाखांना गंडा

शिवसेना नेत्या विद्या गाडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

ओळखीचा फायदा घेत स्वस्तात सोने देतो असे सांगून शेवगाव येथील शिवसेनेच्या नेत्या व त्यांच्या पतीने मुंबई येथील रिलायन्स कॉर्पोरेटच्या व्यवस्थापकाला चार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात शनिवारी दि. 24 रोजी उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी, महिनाभरापूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या विद्या जावेद गाडेकर व त्यांचे पती जावेद यासीन पठाण (रा. शेवगाव) यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात रिलायन्स कॉर्पोरेटचे व्यवस्थापक अतुल नामदेव अटकळे (वय 37रा. जुना ठाणे शहर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणूक, मारहाण, धमकी अशा विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player

फिर्यादी म्हटले आहे, दि. 23 डिसेंबर 2020 ला जावेद यासीन पठाण याने अटकळे यांना त्यांच्या राहत्या घरी विद्यानगर येथे बोलावून घेतले. त्यावेळी त्याची पत्नी विद्या या देखील घरीच होत्या. यावेळी घरात असलेली चैतन्य कानिफनाथ मढी यांच्या गादीचे दर्शन घेण्यास सांगितले आणि त्यांचे घरात असलेले सोन्याचे दागिने दाखविले. त्यावेळी जावेद पठाण अटकळे यांना म्हणाला, त्याचा सोने विक्रीचा व्यवसाय आहे, मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतो, सोने खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याने इतरांना कमी दरात शुद्ध सोने विक्री करून त्याचा फायदा करून दिलेला आहे. जास्तीत जास्त पैशाची गुंतवणूक केली तर कमी दरात सोने देईल.

आमच्यावर विश्वास ठेव, आम्ही फसवणूक करणार नाही, असे आश्वासन दिले. त्या दोघांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागदागिने दाखविल्यानंतर त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, आमिषाला बळी पडून फिर्यादीने 15 जानेवारी 2021 ला 2 लाख रुपये आणि 23 जानेवारी 2021 ला आणखी 2 लाख रुपये असे 4 लाख रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग केले. मात्र त्यानंतर सांगितल्याप्रमाणे, त्या दोघांनी शुद्ध सोने दिले नाही. दरम्यानच्या काळात कोव्हिड असल्याने अटकळे यांचे शेवगाव येथे येणे झाले नाही. यादरम्यान त्यांनी वेळोवेळी फोन करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन घेतले नाही.

तसेच त्यांनी कोणतेही शुद्ध सोने दिले नाही. आणि गुंतवणूक केलेले पैसेही परत केले नाही. प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. त्या दोघांना पैसे मागितले असता तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करू आणि जेलमध्ये टाकू अशी धमकी दिली, असेही फिर्यादी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची 3634 गोण्यांची आवक झाली. कांदा...