Friday, May 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal: मग तुम्हाला SEBC, EWS, ओपन, राज्य सरकारने दिलेलं १० टक्के...

Chhagan Bhujbal: मग तुम्हाला SEBC, EWS, ओपन, राज्य सरकारने दिलेलं १० टक्के आरक्षण नको का? मंत्री छगन भुजबळांचा मराठा समाजाला सवाल

नाशिक | Nashik
राज्यातील मराठा समाजाला आतापर्यंत त्यांच्यासाठी लागू असलेले कोणतेही आरक्षण नको, फक्त ओबीसीतूनच आरक्षण हवे का, हे राज्यातील मराठा नेत्यांनी आणि मंत्र्यांनी स्पष्ट करावे, असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी समाजाला विचारला आहे. ओबीसी आरक्षण हवे असल्यास तुम्हाला इतर सवलती आणि आरक्षण नको का? असा सवालही भुजबळांनी विचारला आहे.

- Advertisement -

मराठा समाज यापूर्वी खुल्या प्रवर्गातील ५० टक्क्यांमध्ये येत होता. मग पंतप्रधान मोदींनी १० टक्के आरक्षण दिले. आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिक मागास आहेत पण सामाजिक मागास नाहीत, अशांसाठी हे १० टक्के आरक्षण होते. त्यामध्ये एकटा मराठा समाज ८० टक्के होता. यानंतर राज्यात मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आले. तरीसुद्धा आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन होत आहे. त्यामुळे मला मराठा समाजाला एक प्रश्न विचारायचा आहे की, तुम्हाला १० टक्के EWS, राज्य सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण आणि खुल्या प्रवर्गाचे आरक्षण नको का? तुम्हाला यापैकी कोणतेही मराठा आरक्षण नको का? मग हे आरक्षण रद्द करायचे का? EWS आरक्षणात मराठा समाजाला वाटा ८० ते ९० टक्के इतका आहे. खुल्या प्रवर्गातही ५० टक्के मराठा समाज आहे. हे सगळे आरक्षण सोडून तुम्हाला फक्त ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे आहे का, असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला.

सुशिक्षित मराठे आहेत, जे मुख्यमंत्री, आमदार, खासदार झालेत ज्यांना आरक्षण काय कळतंय, त्यांना विनंती करतोय. आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास मात्र सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशांना १० टक्के आरक्षण दिलं. त्यात ८० टक्के मराठा समाज आहे. पुन्हा मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी होतेय. मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्या अशी आंदोलनं होत आहेत. तुम्हाला १० टक्क्यांचे आरक्षण नको का? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केलाय.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Vaijapur News : मासेमारी करताना जाळ्यात पाय अडकला; ५५ वर्षीय इसमाचा...

0
वैजापूर । प्रतिनिधी वैजापूर तालुक्यातील भटाणा येथील तलावात मासेमारीसाठी गेलेल्या रहीम युसुफ शेख (वय ५५) या कष्टकरी इसमाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मासे पकडण्याच्या...