मुंबई | Mumbai
राज्यात पावसाचा जोर सुरु असतानाच हवामान विभागाने ३१ जुलै पर्यंतचा अंदाज वर्तवला आहे. वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. जुलै अखेर म्हणजेच पुढील चार दिवस विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई वेधशाळेने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, २९ जुलै रोजी विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ३० जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट कायम असेल. या काळात येथे विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यासोबतच २८ ते ३१ जुलै या संपूर्ण चार दिवसांच्या कालावधीत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
असा असणार पावसाचा अंदाज
२८ जुलै २०२६
यलो अलर्ट (Yellow Alert): रायगड, जळगाव, पुणे घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.
२९ जुलै २०२६
ऑरेंज अलर्ट (Orange Alert ): गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.
यलो अलर्ट (Yellow Alert) : नाशिक, नाशिक घाट, जळगाव, छ. संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सातारा घाट, रायगड, पुणे घाट आणि सिंधुदुर्ग.
३० जुलै २०२६
ऑरेंज अलर्ट(Orange Alert): चंद्रपूर.यलो अलर्ट
(Yellow Alert): रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली.
३१ जुलै २०२६
यलो अलर्ट (Yellow Alert): रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, वर्धा आणि यवतमाळ.




