Tuesday, July 2, 2024
Homeराजकीयछगन भुजबळांचे जरांगेंच्या मागणीवर प्रत्युत्तर; म्हणाले, "त्यांचा अभ्यास कमी, मुस्लिम समाजाला…"

छगन भुजबळांचे जरांगेंच्या मागणीवर प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांचा अभ्यास कमी, मुस्लिम समाजाला…”

नाशिक | Nashik

- Advertisement -

काल मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी माध्यमांशी बोलतांना मुस्लिमांच्या ओबीसी नोंदी सापडत आहेत त्यामुळे त्यांना देखील ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगेंना प्रत्युत्तर दिले आहे.

हे देखील वाचा : Manoj Jarange : “मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्या”; जरांगेंची सरकारकडे मागणी

यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “जे ओबीसींच्या समकक्ष आहेत त्यांना आरक्षण मिळत आहे. त्याला आम्ही कधीच विरोध केला नाही.जे आता मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी करताय त्यांचा अभ्यास कमी आहे. त्यांना म्हणावं आधी अभ्यास करा. मुस्लिम समाजाला २५ वर्षापूर्वीच ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) दिले आहे. कधी मुस्लिमांना तर कधी धनगर समाजाला खुश करण्यासाठी जरांगे मागण्या करत असल्याचे म्हणत भुजबळांनी निशाणा साधला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘हाक मराठी’चा मास्टरमाईंड अटकेत

तसेच २५ वर्षांपूर्वी ओबीसीतून कुरेशी, बागवान या घटकांना आरक्षण (Reservation) दिले आहे. दिलीपकुमार यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. त्याच वेळी इकडाचा व्यवसाय तिकडा व्यवसाय साम्य असणाऱ्यांना आरक्षण दिले गेले. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, लक्ष्मण हाके आम्ही सगळे ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी एकत्रित आहोत, असे देखील छगन भुजबळ म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या