नाशिक | Nashik
परभणीतील हिंसाचारानंतर (Parbhani Violence) सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू (Death) झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ परभणी ते मुंबईपर्यंत लाँग मार्च काढण्यात आला होता. पंरतु, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) आणि भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या मध्यस्थीनंतर हा लाँग मार्च नाशिक (Nashik) येथे स्थगित करण्यात आला.
या लाँग मार्चच्या आंदोलकांना भेटण्यासाठी नाशिक येथे भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) आले होते. यावेळी आमदार धस यांनी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू (Death) प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संयुक्तिक होणार नाही. तसेच आरोपी पोलिसांना (Police) मोठ्या मनाने माफ करा, असे वक्तव्य केले होते. धस यांच्या या विधानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. यावर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत धसांना चांगलेच सुनावले.
यावेळी बोलतांना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की,”संतोष देशमुख असो, सोमनाथ सूर्यवंशी असो किंवा लातूरमधील एक धनगर समाजाच्या युवकाचा मृत्यू असो, या सर्वांना एकच न्याय असावा. जो कोणी दोषी असेल, त्या सर्वांना कडक शिक्षा झाली पाहिजे. मराठा, दलित, धनगर समाजाचा आहे, असे म्हणून मारलेलं चालतं असं होत नाही. संविधानाचा देश आहे, सर्वांचा न्याय झाला आहे. एकदा ही सुरुवात झाली की सगळ्याच प्रकरणांत मागणी होईल. मात्र न्यायालय हे ऐकणार आहे का? कायदा कायद्याच्या दृष्टीने काम करेल. सगळ्यांना सारखाच न्याय मिळाला पाहिजे”, असे म्हणत त्यांनी आमदार सुरेश धस यांना फटकारले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाडांची सुरेश धसांवर टीका
आमदार सुरेश धसांच्या या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “दुसर्याच्या घरातील माणसाचा खून झाला आहे. त्यात तिसर्या माणसाने जाऊ द्या, त्याला माफ करा, असे बोलणे योग्य नाही आणि तसे बोलणं खूप सोपे असते. मात्र पोटच्या पोराचा जीव गेल्यानंतर त्या आईला काय वाटत असेल, याचा जरा विचार बोलण्याआधी करायला हवा होता. सगळ्याच ठिकाणी राजकारण करू नये, आपली पोळी भाजण्याची सवय चांगली नाही. पण हा ज्याचा-त्याचा विचार आहे. मात्र या प्रकरणात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही माफी मिळणार नाही. ज्यांनी सोमनाथला मारलं, त्यांना शिक्षा होणारच, याची खात्री आम्ही देतो. धस यांच्याकडे क्षमायाचनेचे भाव असतील तर त्यांनी साधूसंत व्हावे आणि हिमालयात जावे. तसेच वाल्मिक कराडलाही माफ करावे”, असा हल्लाबोल त्यांनी सुरेश धस यांच्यावर केला आहे.