Tuesday, October 22, 2024
Homeनाशिकराज्यातील विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द - भुजबळ

राज्यातील विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द – भुजबळ

येवला | प्रतिनिधी | Yeola

आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही. देशात आणि राज्यात त्यांची संख्या अधिक आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) वतीने विविध योजना राबविण्यात येत असून राज्यातील विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Uddhav Thackeray : “मीच तुझा भाऊ, सर्व फुकट खाऊ”; उद्धव ठाकरेंचा महायुतीवर निशाणा

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्या हस्ते आज संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. येवला येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संविधान मंदिराचे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हे देखील वाचा : ई-पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ; ‘ही’ आहे अंतिम तारीख

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचा कुठलाही अधिकार नसतांना मुलींना शिक्षण देण्याचे कार्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं. यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची निर्मिती करून देशातील सर्व नागरिकांना सर्वांना समान अधिकार प्राप्त झाले. सर्वांना समान पातळीवर अधिकार देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik News : उद्या ईद-ए-मिलाद; भद्रकालीतील वाहतूक मार्गांत बदल

ते पुढे म्हणाले की, भारतीय संविधान हे अतिशय मजबूत पायावर उभ आहे. आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था टिकविण्यास सर्वांना एकसंघ बांधून ठेवण्याचे काम संविधानाने केलं आहे. भारताच्या संविधानाचा अभ्यास करून अनेक देशांनी आपल्या संविधानाची निर्मिती केली आहे. आपलं संविधान अतिशय बळकट असून संविधान बदलणे हे अशक्य आहे. या संविधानाचा अपमान होणार नाही. त्यातील कायद्यांचे आणि नियमांचे उल्लंघन होणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : साठ लाखांच्या खंडणीची मागणी; कंपनी चालकाची न्यायालयात तक्रार

दरम्यान, यावेळी प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.मोहन शेलार, मलिक शेख, प्राचार्य वाय.के.कुलकर्णी, स्थानिक प्राचार्य आर.एस.राजपूत, गटनिधेशक आर.के.आहेर, डी.एल.मगर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या