Monday, October 14, 2024
HomeनाशिकNashik News : उद्या ईद-ए-मिलाद; भद्रकालीतील वाहतूक मार्गांत बदल

Nashik News : उद्या ईद-ए-मिलाद; भद्रकालीतील वाहतूक मार्गांत बदल

'असे' आहेत पर्यायी मार्ग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सोमवारी (दि. १६) मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद (Eid-e-Milad) सण असून, यानिमित्ताने शहरातील भद्रकाली व नाशिकरोड (Bhadrakali and Nashik Road) या परिसरात जुलूस मिरवणूक काढण्यात येणार आहे. या जुलूसमुळे वाहतुकीचा कोंडी टाळण्यासाठी शहरासह नाशिकराेड येथील वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sharad Pawar : “सत्तेचा माज काहींच्या डोक्यात…”; शरद पवारांचा केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल

तशी अधिसूचना वाहतूक (Transportation) शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी (Chandrakant Khandvi) यांनी लागू केली आहे. भद्रकालीतून जुलूसला दुपारी १२ वाजता प्रारंभ होणार असून, जुलूस संपेपर्यंत तर, नाशिकरोड येथे सकाळी ९ वाजता जुलूसला प्रारंभ होणार असून, जुलूस संपेपर्यत वाहतूक मार्गातील बदल कायम असेल असेही उपायुक्त खांडवी यांनी स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : साठ लाखांच्या खंडणीची मागणी; कंपनी चालकाची न्यायालयात तक्रार

भद्रकालीतील जुलूस मार्ग

चौक मंडई-बागवानपूर- कथडा मस्जिद – शिवाजी चौक – मीरा दातार दर्गा – आझाद चौक – चव्हाटा देवीमंदिर – सुभाष वाचनालय – बुधवारपेठ – आदमशहा दर्गा – काझीपुरा पोलीस चौक – कोकणीपुरा- दुधबाजार – त्र्यंबक पोलीस चौक – खडकाळी सिग्नल- युटर्न घेऊन – त्रंबक पोलीस चौकी – दुधबाजार – पिंजारघाट रोड – बडी दर्गा येथे समारोप

नाशिकरोड जुलूस मार्ग

बिटको चौक- अनुराधा चौक – सत्कार पॉईंटकडून देवळाली गाव मार्गे विहितगा सिग्नल – बागूल नगर – देवळाली गाव मनपा मैदनावर समारोप

हे देखील वाचा :  Nitin Gadkari : “मला विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती”; नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट

भद्रकाली प्रवेश बंद मार्ग

  • सारडा सर्कल ते हाजी टी पॉईंट
  • शिवाजी चौक ते मीरा दातार दर्गा
  • शिरसाठ हॉटेल ते आझाद चौक
  • खडकाळी सिग्नल ते अब्दुल हमीद चौक पर्यायी मार्ग
  • सारडा सर्कल ते हाजी टी पॉईंटकडे जाणारी वाहतूक वडाळानाका, मोठा राजवाडा मार्गे मार्गस्थ
  • मीरा दातार मार्गे जाणारी वाहतूक शितळादेवी मार्गे कुंभारवाडा मार्गे
  • दुधबाजारकडे जाणारी वाहतूक शालिमार मार्गे

पर्यायी मार्ग

  • सारडा सर्कल ते हाजी टी पॉईंटकडे जाणारी वाहतूक वडाळानाका, मोठा राजवाडा मार्गे मार्गस्थ
  • मीरा दातार मार्गे जाणारी वाहतूक शितळादेवी मार्गे कुंभारवाडा मार्गे
  • दुधबाजारकडे जाणारी वाहतूक शालिमार मार्गे

हे देखील वाचा : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा तीन मजली इमारत कोसळली; नऊ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

नाशिकरोड प्रवेश बंद मार्ग

  • बिटको सिग्नलकडून विहितगाव सिग्नलपर्यंत जाणारी एकेरी लेनची वाहतूक बंद
  • देवळाली कॅम्पकडून बिटको सिग्नलकडे वाहनांना प्रवेश बंद

नाशिकरोड पर्यायी मार्ग

  • देवळाली कॅम्पकडे जाणारी वाहतूक दत्त मंदिर सिग्नलकडून उजवीकडून दत्तमंदिर रोड – सुराणा हॉस्पिटल – आर्टिलरी सेंटर रोड -खोळे मळा – रोकडोबा वाडी – विहितगाव मार्गे जातील-येतील
  • देवळाली कॅम्पकडून बिटको सिग्नलकडे विहितगाव सिग्नल येथून डावीकडे वळून वडनेर रोडने रोकडोबावाडी- आर्टिलरी सेंटर रोड- सुराणा हॉस्पिटल- दत्तमंदिर रोड सिग्नल मार्गे येतील-जातील
  • नाशिककडून पुणेकडे जाणारी-येणारी अवजड वाहने सावरकर उड्डाणपुलावरून येतील-जातील.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या