Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजई-पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ; 'ही' आहे अंतिम तारीख

ई-पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ; ‘ही’ आहे अंतिम तारीख

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महसूल विभागामार्फत राज्य ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) या प्रकल्पाद्वारे शेतक-यांना (Farmer) आपला पीक पेरा स्वतः नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या नोंदणीची मुदत रविवार (दि.१५) होती. मात्र, अद्यापही काही शेतकर्‍यांनी ई पीक पाहणी अ‍ॅप द्वारे पीक पेरा नोंदविला नसल्याने शेतकर्‍यांना नोंदणीसाठी दि.२३ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (Dr. Praveen Gedam) यांनी दिली.

- Advertisement -

हे देखील वाचा :   Nitin Gadkari : “मला विरोधकांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती”; नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट

नाशिक विभागातील (Nashik Division) सर्व शेतकर्‍यांनी खरीप हंगामात (Kharif Season) केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे (App) पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. खरीप हंगाम २०२४-२५ करिता शेतकरी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्यासाठी महसूल दिनापासून (१ ऑगस्ट) सुरुवात झाली. दि. १५ सप्टेंबर पर्यंत शेतकरी स्तरावरील पीक पाहणी करता येणार होती. परंतू, राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी विहीत मुदतीत पूर्ण झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने राज्य शासनाने शेतकरी स्तरावरील या नोंदणीसाठी दि.२३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी जाहीर केले आहे.

आरोग्यम् | वेदना कमी करण्यासाठी 'पेन क्लिनिक' | Dr.Nilesh Lodha | Dr.Vaishali Balajiwale
दै. ‘देशदूत’चा ५५ वा वर्धापन दिन 2024 आरोग्यम् मुलाखत – विषय : वेदना कमी करण्यासाठी ‘पेन क्लिनिक’

खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये दि. १३ सप्टेंबर पर्यंत नाशिक विभागात १५ लाख ४८ हजार ६२२ हेक्टर इतक्या क्षेत्रावरील ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. तर जवळपास १६ लाख ४७ हजार ५६ हेक्टर क्षेत्रावर पीक पाहणी नोंदविण्यात आलेली नाही. राज्य शासनाने “माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा” च्या उद्देशाने स्वतः च्या शेताची पीक पाहणी स्वतः करण्याची संधी ई पीक पाहणी अ‍ॅपद्वारे राज्यातील सर्व शेतक-यांना उपलब्ध करून दिली आहे. पीक विमा, नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे तसेच भूसंपादन इ. करिता ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे शेतकर्‍यांनी पीक पाहणी नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी केले आहे.

हे देखील वाचा :  Sharad Pawar : “सत्तेचा माज काहींच्या डोक्यात…”; शरद पवारांचा केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल

ई-पीक पाहणी करण्यामध्ये काही समस्या असल्यास ०२०२५७१२७१२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करुन मदत घेता येऊ शकते. इंटरनेटची (Internet) आवश्यकता फक्त शेतकरी नोंदणी वा पिक पाहणी अपलोड करणेकामी आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतामध्ये इंटरनेट सुविधा नाही, त्याठिकाणी सुद्धा पीक पाहणी करता येते. सहाय्यक, तलाठी स्तरावरील पिक पाहणी नोंदविण्यासाठी देखील सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, आता दि.२४ सप्टेंबर ते दि.२३ नोव्हेंबर या कालावधीत सहाय्यक, तलाठी पीक पाहणी नोंदवू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...