Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकChhagan Bhujbal : मंत्रिमंडळात भुजबळांना स्थान न मिळाल्याने समर्थक आक्रमक; नाशिक, बुलढाण्यात...

Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळात भुजबळांना स्थान न मिळाल्याने समर्थक आक्रमक; नाशिक, बुलढाण्यात रास्तारोको आंदोलन

नाशिक | Nashik

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारचा (Mahayuti Government) पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवार (दि.१५) रोजी पार पडला. या विस्तारात एकूण ३९ आमदारांना मंत्रि‍पदाची शपथ घेतली, त्यामुळे मंत्रिमंडळाची संख्या ४२ वर गेली आहे. भाजपच्या कोट्यातील एक मंत्रीपद रिक्त आहे. या विस्तारानंतर तिन्ही पक्षातील नाराजीनाट्य समोर येऊ लागले आहे. यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना डावलण्यात आल्याने ते नाराज आहेत, तशी जाहीर नाराजी त्यांनी माध्यमांसमोर स्पष्टपणे बोलून दाखवली आहे.

- Advertisement -

त्यानंतर आता भुजबळ समर्थक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी नाशिक व बुलढाण्यात रास्तारोको आंदोलन केले आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावरील विंचूर येथे भुजबळ समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. यावेळी छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली. या सुमारे अर्धा तास रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलन केल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांच्या समर्थकांनी दिला.

तसेच नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर (Nashik NCP office) भुजबळ समर्थकांनी भुजबळसाहेबांना मंत्री मंडळात न्याय द्यावा अशा घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला. तर दुसरीकडे बुलढाण्यातील (Buldhana) सिंदखेडराजा येथे ओबीसी समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढत नागपूर-पुणे या महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा निषेध करण्यात आला.

दरम्यान, भुजबळांच्या नाराजीची राष्ट्रवादीकडून देखील दखल घेण्यात आली असून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अजित पवार यांनी आपले निकटवर्ती प्रमोद हिंदुराव यांना भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्याकडे पाठवले होते, या दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली. त्यामुळे आता छगन भुजबळांना केंद्रात महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...