Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal : जरांगेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,...

Chhagan Bhujbal : जरांगेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “देर आए दुरुस्त…”

नाशिक | Nashik

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षांकडून उमेदवारांची यादी न आल्यामुळे माघार घेत असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. तसेच मराठा बांधवांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी राजकीय पक्षांना इशाराही दिला आहे. याशिवाय पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यानंतर आता मनोज जरांगे पाटलांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : “…तर तुमचा बाबा सिद्दिकी करू”; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, “मनोज जरांगेंच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. एका समाजावर निवडणूक (Election) लढविता येत नाही, हे जरांगेंना उशिरा कळल्याने ‘देर आए दुरुस्त आए’ असेच म्हणावे लागेल. निवडणुकीत सर्व धर्मियांचा पाठिंबा असावा लागतो. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांना काम करावे लागते. त्यामुळे जरांगेंनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Jitendra Awhad : “… ही पाकीटमारांची टोळी”; जितेंद्र आव्हाडांचा राष्ट्रवादीवर निशाणा

तसेच मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता महाराष्ट्रात (Maharashtra) मोकळ्या पद्धतीने निवडणुका लढविल्या जातील. याशिवाय मराठा बांधव देखील मोकळ्या पद्धतीने मतदान करतील. त्यामुळे आता मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करून लोकशाही बळकट करावी, असेही छगन भुजबळ म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...