Sunday, May 5, 2024
Homeनगरबंदिस्त असलेला पुतळा मुक्त करावा या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेचे उपोषण

बंदिस्त असलेला पुतळा मुक्त करावा या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेचे उपोषण

राहाता l प्रतिनिधी

तहसिलच्या गोडावुन मध्ये बंदिस्त असलेला पुतळा मुक्त करावा या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेने (Chhawa Krantiveer Sena) पुकारलेल्या उपोषणाला काही प्रमाणात यश मिळाले असुन नगरपालिका प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले.

- Advertisement -

छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने गोडावून मध्ये बंदीस्त असलेला पुतळा मुक्त करावा या मागणीसाठी चलो राहाता (Rahata) अशी हाक देत उपोषणाचा पावित्रा घेतला होता.

छावा क्रांतिवीर सेनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर तहसिलदार कुंदन हिरे, मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण, शिर्डी पोलिस ठाण्याचे पो.नि. प्रविण लोखंडे, राहाता पोलिस ठाण्याचे पो.नि. सुभाष भोये यांनी यशस्वी मध्यस्ती करत नगरपालिकेच्या वतीने लेखी आश्वासन देत आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न केले. छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी न.पा ने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तुर्त स्थगित करण्याचे घोषित केले.

दोन महिन्यात प्रशासनाने योग्य ती कारवाई करुन पुतळा मुक्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर , प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे , मनसेचे रामनाथ सदाफळ यांनी पाठींबा दर्शवला.

- Advertisment -

ताज्या बातम्या