Friday, May 3, 2024
Homeजळगावचिकुची आवक वाढली ; भाव घसरले

चिकुची आवक वाढली ; भाव घसरले

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

उन्हाळ्याची चाहुल लागली की बाजारात अनेक नवीन फळे येतात, यात गारेगार काकडी, कलिंगड, संत्री, खरबूज आणि चिकूसारख्या फळांचा समावेश आहे. यंदा मात्र चिकुचे विक्रम उत्पादन झाल्यामुळे चिकुचे भाव घसरले आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चिकु विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आल्याने चिकुला १० ते २० रुपये किलो भाव मिळत आहे.

- Advertisement -

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात फळाची दररोज खरेदी-विक्री होत असते. येथील बाजारात समितीमध्ये तालुक्यासह इतर जिल्ह्यातून फळाचा माल येत असतो. यंदा पावसाळा चांगला झाला व कोरोनामुळे शेतकर्‍यांनी बराच वेळ शेतीला दिल्यामुळे चिकुचे विक्रमी उत्पन्न झाले.

त्यामुळे येथील बाजार समितीत तालुक्यातील पतोंडा, हिरापूर, तळेगांव, हातले, वाघळीसह कन्नड, पिशोर आदि भागातून मोठ्या प्रमाणात चिकु विक्रीसाठी येत आहेत. हा चिकु गोलपल्ली जातीचा असून आकाराने मोठा आहे. तसेच खाण्यासाठी तो साखरेपेक्षाही गोड आहे. येथील बाजार समितीत दररोज पाच ते सात टन चिकु विक्रीस येत आहे. त्यामुळे चिकुचे भाव घसरले आहेत. चिकुचे भाव होलसेल मार्केटमध्ये १० ते ३० रुपये किलो आहेत. तर किरकोल बाजारत ३० ते ५० रुपये किलोने विक्री होत आहेत. चिकुला पाहिजे तसा भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. परंतू कोरोना कालवधीतही हाताला दोन पैसे मिळत असल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

चिकू खाण्याचे आरोग्यदायी फायदे-

चिकूमध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद व आद्र्रता भरपूर प्रमाणात असतात. तसेच ‘ अ ’ जीवनसत्त्व मोठया प्रमाणावर असते. तर अल्प प्रमाणात ‘ क ’ जीवनसत्त्व आणि नैसर्गीक शर्करा भरपूर प्रमाणात असते. चिकू मधील गुणधर्मामुळे थकलेल्या, दमलेल्या, अशक्त झालेल्या निरुत्साही व्यक्तीस चिकूचे सेवन हे अमृतासमान आहे. बालकांना अभ्यास व खेळण्यामुळे शारीरिक व मानसिक थकवा आल्यानंतर चिकू खायला दिल्याने त्यांच्यात नवा उत्साह व शक्ती संचारते. त्यामध्ये शर्करेचे प्रमाण अधिक असल्याने ती रक्तात मिसळून लगेचच थकवा घालवते. चिकू हे मधुर, श्रमहारक, तृप्तीदायक, दाहनाशक असल्याने श्रम करून थकवा आलेल्यांनी चिकू खाल्ल्याने नवी ऊर्जा मिळते. चिकू, शीतल व दाहशामक असल्याने अरुची, मळमळ आम्लपित्त, अतिसार या आजारांमध्ये उपयुक्त आहे.

चाळीसगाव तालुक्यासह इतर तालुक्यातून येथील बाजार समितीत दररोज पाच ते सहा टन चिकुची आवक होत आहे. चिकुची आवक जास्त असल्यामुळे भाव पडले आहेत. परंतू तरी देखील चिकुला बाजारात प्रचंड मागणी असल्याने शेतकर्‍यांच्या मालाला उठाव आहे. कोरोना कालवंधीत चिकुची विक्रमी विक्री होत असल्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक उत्पन्न मिळत आहे.

सर्वेश प्रभाकर कोेठवडे, व्यापारी

- Advertisment -

ताज्या बातम्या