Monday, October 5, 2026
Homeक्राईमपाच वर्षीय बालक व मुलीचे अपहरण

पाच वर्षीय बालक व मुलीचे अपहरण

एमआयडीसी हद्दीत घडल्या घटना || पोलिसांकडून शोध सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून एक अल्पवयीन मुलगी व पाच वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना गुरूवारी (7 नोव्हेंबर) घडल्या आहेत. या प्रकरणी पीडितांच्या पालकांनी शुक्रवारी (8 नोव्हेंबर) एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिल्या असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.

- Advertisement -

एका व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचा पाच वर्षीय अल्पवयीन मुलगा गुरूवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरी असताना त्याला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. फिर्यादी व नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. फिर्यादी यांनी शुक्रवारी पहाटे पोलिसांना माहिती देत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस मुलाचा शोध घेत आहे.

एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलीला (वय 16) अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास पळवून नेले. फिर्यादी व नातेवाईकांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यांनी शुक्रवारी पहाटे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस मुलीचा शोध घेत आहे.

ताज्या बातम्या

Nashik MC News : महापालिकेच्या पाच विषय समित्यांची निवडणूक जाहीर; बिनविरोधासाठी...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिकेतील (Nashik Municipal Corporation) पाच प्रमुख विषय समित्यांच्या सभापतीपदांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याबरोबरच ही पाचही पदे बिनविरोध मिळविण्याची...