Monday, October 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुंबईकडे निघालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना ठाण्यात रोखलं; पोलिसांच्या कारवाईवर गंभीर आरोप

मुंबईकडे निघालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना ठाण्यात रोखलं; पोलिसांच्या कारवाईवर गंभीर आरोप

ठाणे/मुंबई | Mumbai
आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या ‘उलगुलान पायी मोर्चा’ला ठाणे हद्दीत पोलिसांनी अडवल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. मोर्चेकरी विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांचे फोटो काढले आणि गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. काही विद्यार्थ्यांशी पोलिसांची धक्काबुक्की झाल्याचाही दावा करण्यात आला असून, या कारवाईत काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांना मुंबईत आझाद मैदान किंवा राजभवन परिसरात आंदोलनासाठी परवानगी मिळत नसल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला होता. पोलिसांकडून मात्र काही आंदोलकांना विविध ठिकाणांहून ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

नाशिकपासून सुरू झाला ‘उलगुलान’ मोर्चा
आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील विविध समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सुरू करण्यात आला. 28 सप्टेंबर 2026 रोजी नाशिकहून मुंबईच्या दिशेने या पायी मोर्चाला सुरुवात झाली. नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी यापूर्वी दीर्घकाळ आंदोलन केले होते. मात्र, मागण्यांवर ठोस तोडगा न निघाल्याने मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 4 ऑक्टोबरला मोर्चा भिवंडी परिसरात दाखल झाला होता. त्यानंतर 5 ऑक्टोबरला मुंबईतील राजभवनाच्या दिशेने पुढे जाण्याचे नियोजन होते.

Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर; अचानक दौऱ्याचं नेमकं काय कारण?

रात्री पुढे जाण्यास सांगितले अन् ठाण्यात रोखले
आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्चा मुंबईच्या दिशेने जात असताना रात्री सुमारे एक वाजता पोलिसांनी विद्यार्थ्यांना मुंबईच्या दिशेने पुढे जाण्यास सांगितले होते. मात्र, विद्यार्थी पुढे निघाल्यानंतर ठाणे हद्दीत त्यांना अचानक अडवण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आले. या धावपळीत आणि मध्यरात्रीच्या कारवाईदरम्यान काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना भिवंडी बायपास परिसरात सोडण्यात आले. त्यानंतर स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले असून, जबाब नोंदवल्यानंतर त्यांना सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहे?

  • आश्रमशाळांमधील शिक्षण व्यवस्था तातडीने सुधारावी आणि दर्जेदार शिक्षण दिले जावे.
  • सेंट्रल किचनची जेवणाची व्यवस्था त्वरित बंद करून आश्रमशाळांच्या आवारातच ताजे, दर्जेदार आणि पौष्टिक भोजन तयार करण्यात यावे.
  • आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
  • सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळावी,
  • तसेच या दुरवस्थेला जबाबदार असलेले आदिवासी विकास विभागाचे मंत्री, आयुक्त आणि सचिवांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.

विद्यार्थ्यांना रात्री अडवल्याचा वडेट्टीवारांचा आरोप
या घटनेवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर टीका केली. विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अडवून त्यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची मागणी केली.

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांना तातडीने सोडण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी टिळक भवनमधून कोणालाही अटक केल्याचा दावा फेटाळला आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीतून राम शिंदे यांची माघार

0
अहिल्यानगर । प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत ऐन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम...