Tuesday, May 5, 2026
HomeनगरAhilyanagar : एकाच दिवशी रोखले 10 बालविवाह

Ahilyanagar : एकाच दिवशी रोखले 10 बालविवाह

वधू-वरांच्या पालकांना गुन्हा दाखल करण्याची नोटीस

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महिला व बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात एका दिवसात 11 बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. या कारवाईमुळे बालविवाह प्रतिबंधाबाबत प्रशासनाची सजगता अधोरेखित झाली आहे. दरम्यान, रोखण्यात आलेल्या बालविवाह प्रकरणी संबंधित अल्पवयीन वधू आणि वरांच्या पालकांना जिल्हा महिला बालकल्याण विभागाच्यावतीने नोटीस बजावून गुन्हा दाखल करण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे.

- Advertisement -

रविवार 3 मे 2026 रोजी जिल्ह्यात मोठी लग्नतिथी होती. या दिवशी जिल्ह्यात तब्बल एकाच दिवशी 11 बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे बालविवाह रोखण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईत नगर शहरात 3, अकोलेत 1, राहुरी 1, श्रीगोंदा 1, पाथर्डी 1, नेवासा 1 आणि नगर तालुक्यात 1, श्रीरामपूर 1 असे 10 बालविवाह थांबविण्यात आले. या मोहिमेत पोलीस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका, जिल्हा बालसंरक्षण कक्ष तसेच चाइल्ड हेल्पलाइन कक्ष यांचा सक्रिय सहभाग राहिला. सर्व यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनीही अशा घटनांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, बालविवाह रोखण्यात आलेल्या वधू आणि वरांच्या पालकांना जिल्हा बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असून यापुढे त्यांनी बालविवाह केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे. रविवारी जिल्ह्यात मोठी लग्नतिथी होती. या दिवशी 11 ठिकाणी बालविवाह लावण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र, तो महिला बालकल्याण विभागाने उधळून लावला.

बालविवाह लावणार्‍या वधू-वरांच्या पालकांसह लग्न लावून देणारे भटजी, मंगल कार्यालयाचे मालक, केटर्स, लग्नाला हजर राहणार्‍या व्यक्तींवर बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नूसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यात कोणीही बालविवासह लावू नयेत.
– संजय कदम, महिला व बालविकास अधिकारी

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 771 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाकडे नजरा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्‍या 771 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम फेबु्रवारी महिन्यांत जाहीर करण्यात आला होता. या प्रभाग...