नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे (Maharashtra Public Service Rights Commission) नाशिक विभागाचे कार्यालय सुरू झाले असून चित्रा कुलकर्णी (Chitra Kulkarni) यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे…
कुलकर्णी या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) १९८८ मध्ये विक्रीकर अधिकारी वर्ग १ म्हणून शासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यांनी पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur) व नाशिक (Nashik) येथे विक्रीकर विभागात तर पाच वर्ष मंत्रालयात वित्त विभागात काम केले आहे.
२०१५ ते २०१८ या कालावधीत नाशिक येथे अपर राज्य कर आयुक्त, वस्तू व सेवाकर या पदावर त्यांनी काम केले. शासन सेवेत ३० वर्षे काम करून २०१८ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
परंतु, प्रशासकीय अनुभव आणि गुणवत्तापूर्ण कामामुळे शासनाने त्यांना लोकसेवा हक्क आयुक्तपदी काम करण्याची संधी देत त्यांची नियुक्ती केली. आयोगाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून नाशिक विभागीय कार्यालय सध्या दारणा कक्ष, तळमजला, सिंहगड इमारत, शासकीय विश्रामगृह, चांडक सर्कल, नाशिक येथे सुरू झाले आहे.
मुदतीत सेवा देण्यासाठी कायदा
राज्य शासनाचे (State Government) वेगवेगळे विभाग व महामंडळे यांच्याकडून नागरिकांना विहित मुदतीत सेवा देण्यासाठी लोकसेवा हक्क हा एक महत्त्वाचा कायदा शासनाने २०१५ पासून लागू केला शासनाच्या विविध विभागांच्या एकूण ५०६ सेवा या कायद्याखाली अधिसूचित केल्या आहेत.





