Tuesday, July 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमेळघाट बालमृत्यू : अमरावतीच्या आदिवासी भागात पाणी पुरवठा करा - हायकोर्टाचे राज्य...

मेळघाट बालमृत्यू : अमरावतीच्या आदिवासी भागात पाणी पुरवठा करा – हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश  

मुंबई | कायदा प्रतिनिधी | Mumbai  

उन्हाळ्यात तापमानाचा परत वाढत आहे. तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असून पाऊस पडेपर्यंत विदर्भात तापमान वाढले आहे. या परिसरातील ग्रामीण भागात पाण्याचा  तुटवडा असल्याने हायकोर्टाने (High Court) चिंता व्यक्त करत अमरावतीच्या आदिवासी भागातील प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याचा किमान एक टँकर पाणी पुरवठा करा. असे आदेश सरकारला दिले.

- Advertisement -

मेळाघाटातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते बंडू साने, डॉ राजेंद्र बर्मा यांच्यासह डॉ अभय बंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर आज (बुधवारी) न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मेळाघाटातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते बंडू साने, डॉ राजेंद्र बर्मा यांच्यासह डॉ अभय बंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर आज (बुधवारी) न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड.जुगल गिल्डा यांनी , धारणी, चिखलदरा आणि चूर्णी यांसारख्या भागातील जलस्त्रोत पूर्णपणे आटले आहे. बाष्पीभवनाचा वेग प्रचंड असल्याने विहिरी कोरड्या पडल्या असून गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण सुरु आहे..याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याची गंभीर दखल घेत खंडपिठाने चिंता व्यक्त केली. या परिसरात पाणी पुरवठा (Water Supply) कसा केला जातो असा सवाल केला. यावेळी  अतिरिक्त सरकारी वकील ऍड..भूपेश सामंत यांनी राज्य सरकार या समस्येवर तातडीने उपाययोजना करत आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशाची वाट न पाहता, प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल आणि पुढील सुनावणीत (Hearing) याचा वस्तुस्थिती अहवाल सादर केला जाईल. असे स्पष्ट केले . याची नोंद घेत खंडपीठने  याचिकाकर्त्यांना पाणीटंचाई असलेल्या गावांची यादी सरकारी वकिलांना तातडीने सादर करावी असे निर्देश देत सुनावणी ७ मे पर्यंत तहकूब केली.

ताज्या बातम्या

Nashik News : ​ सावळघाटात भीषण अपघात; चार जण ठार, एक...

0
पेठ | प्रतिनिधी Peth नाशिक-पेठ रस्त्यावरील सावळघाटात आज सायंकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. पेठ-दिंडोरी हद्दीलगत एका भरधाव ट्रकचे ब्रेक फेल...