Wednesday, February 19, 2025
Homeक्राईमचर्च जमीन फसवणूक प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

चर्च जमीन फसवणूक प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

शासकीय यंत्रणेच्या मदतीने संगनमत करत परस्पर विकली जमीन

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा शहरातील चर्चच्या जमीन विक्रीसाठी बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय यंत्रणेच्या मदतीने जमीन विक्री केल्याप्रकरणी अखेर चारजंणावर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सुजित भैरु जाधव (अध्यक्ष दि कॉन्फरन्स ऑफ चर्चस ऑफ काइस्ट इन वेस्टर्न इंडिया) यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ‘सार्वमत’ ने पाठपुरावा केला होता.

- Advertisement -

दरम्यान, या जमीन फसवणूकप्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीवरून दीपक नामदेव गायकवाड (रा. कोडोली ता, पन्हाळा जिल्हा कोल्हापूर, सतिष डॅनियल भालेराव (रा. मिशन कंपाउड श्रीगोंदा, घोडेराव रोड श्रीगोंदा), वैभव वसंतराव पारधे, रा. बारामती, संदिपान किसन तुपारे रा. यशोदानगर इंगळेवस्ती (ता. जिल्हा अहिल्यानगर) यांनी संगनमताने 12 सप्टेंबर 2023 रोजी पासू ते 8 नाव्हेंबर 2024 यादरम्यान, चर्चच्या जमिनीची बेकायदेशीर कागदपत्रे तयार करून शासकीय यंत्रणा हाताशी धरून जमीन विक्री व्यवहार केला.

याप्रकरणी जाधव यांच्या तक्रारीवरून 15 जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात फिर्यादी जाधव याची संस्था दि कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ क्राइस्ट इन वेस्टर्न इंडिया पीटीआर नंबर एफ 179 श्रीगोंदा येथे शेत जमीन नगर पालिका सर्व्हे नंबर 1749 मध्ये 10 हेक्टर 92 गुंठे क्षेत्र आहे. त्यामध्ये संस्थेचे हायस्कूल, चर्च धार्मिक स्थळ, प्राथमिक शाळा, बालगृह, निवासस्थान, आरोपीत मजकूर यांनी संगनमताने कट करून, स्थावर मालमत्तेचे बनावटी कागदपत्रे तयार करून संस्थेच्या नावे असणारे शेत जमीन ही विश्वासघाताने फसवणूक करून शासकीय यंत्रणेच्या मदतीने आरोपी दीपक गायकवाड याने स्वतःच्या नावे केली आहे व त्याची बेकायदेशीरपणे विक्री केली आहे. जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्रालयीन परवानगीनंतर त्या अधिकार्‍यांवर गुन्हा ?
याप्रकरणात दोषी असणार्‍या महसूलच्या तालुक्यातील बड्या अधिकार्‍यांसह अन्य कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी महसूल विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून परवानगीची गरज असल्याचे सांगण्यात आले. यामुळे श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात महसूलच्या अधिकार्‍यांची नावे आलेली नाहीत. मात्र, लवकर संबंधितांविरोधात फास आवळण्यात येणार असून महसूलच्या मंत्रालयीन परवानगीनंतर गुन्हे दाखल होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

तडजोडीसाठी सरसावली ‘यंत्रणा’
श्रीगोंदा तहसील कार्यालयात सुरू असलेली अनागोंदी, तडजोडीचा कारभार या चर्च जमीन घोटाळ्यामुळे उजेडात आला.आता प्रकरणात आपलं नाव येवू नये, म्हणून काहींनी मध्यस्थी मार्फत तक्रारदार यांच्याकडे संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. यावरून या प्रकरणात महसूलच्या बाजूने तडजोड करण्यासाठी यंत्रणा सरसावली असल्याची चर्चा सुरू आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या