बीड
बीडच्या मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा स्वतहून पुण्याच्या सी आय डी कार्यालयात हजर झाल्यानंतर नियमानुसार आरोपी वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्या नंतर लगेचच आज रात्री उशीरा वाल्मिक कराडला बीड च्या केज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
- Advertisement -
गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिकवर केवळ खंडणीचा आरोप नसून हत्या प्रकरणाचाही आरोप असल्याने त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी दिली आहे.