Friday, May 3, 2024
Homeधुळेदेवपूरात चोरट्यांचा नागरिकांनीच वाजविला बँण्ड

देवपूरात चोरट्यांचा नागरिकांनीच वाजविला बँण्ड

धुळे । प्रतिनिधी Dhule

शहरातील देवपूर परिसरातील गोंदुर रोडवरील शांकुतल सोसाटीत घरफोडी करून चोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांना नागरिकांनी रंगेहाथ पकडून चांगलाच बँण्ड वाजविला. त्यांना पश्चिम देवपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सचिन एकनाथ पगारे (वय 43) व चेतन किशोर वाघमारे (वय 23 रा. मोगलाई, धुळे) अशी दोघा चोरट्यांनी नावे आहेत. दोघे काल दि. 21 रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने गोंदुर रोडवरील शाकुंतल सोसायटीत फिरत होते. तेव्हा परिसरातील काही नागरिकांना ते दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी फोनव्दारे एकमेकांना कळवत दोघांवर पाळत ठेवली. त्यादरम्यान दोघांनी प्रथम एका बंद घरात संरक्षण भिंतीवरून उडी मारून प्रवेश केला.

परंतू त्यांच्याकडून त्या घराचे कुलूप तुटले नाही. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा परिसरातील अवधान एमआयडीसीतील ब्रॅन्च मॅनेजर असलेल्या योगेश भाईदास शिसोदे (वय 26 रा. प्लॉट नं. 48, रा. शाकुंतल सोसायटी) यांच्या बंद असलेल्या घराकडे वळविला. लोखंडी टॉमीच्या सहाय्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील कपडे व इतर साहित्य अस्तावस्थ फेकुन ऐवज शोधत असतांनाच नागरिकांनी दोघांना रंगेहाथ पकडले. त्यादरम्यान काही संतप्त नागरिकांनी दोघा चोरट्यांना चोपही दिला.

याबाबत पश्चिम देवपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पेट्रोंलिंगवर असलेल्या कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोघांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत बाहेरगावी गेलेल्या घरमालक योगेश शिसोदे यांना कळविण्यात आले. त्यांनी दुपारी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून वरील दोघा चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या