Friday, May 3, 2024
Homeजळगावनागरीकांनी मागीतला आ.राजूमामा भोळेंना राजीनामा..

नागरीकांनी मागीतला आ.राजूमामा भोळेंना राजीनामा..

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृह (Ajanta Government Rest House) ते रामानंदनगरपर्यंतच्या (Ramanand nagar) रस्त्याचे (road) गेल्या काही वर्षांपासून डांबरीकरण (Asphalting) झालेले नाही. त्यामुळे या रस्त्यावर खड्डेच खड्डे (Pits, pits) असून त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यामुळे जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी (Citizens) गिरणा टाकी परिसरातील चर्च जवळ आंदोलन (Movement) केले. रस्ता तयार करा, अथवा राजीनामा द्या. असा संतप्त सवाल उपस्थित करत, आ. राजूमामा भोळे (MLA Rajumama Bhole) यांच्या राजीनाम्याची (demand resignation) यावेळी मागणी केली.

- Advertisement -

अजिंठा शासकीय विश्रामगृह ते रामानंदनगरपर्यंत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर दररोज अपघात (Accident) होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. असे असतांनाही मनपा प्रशासनासह आ.राजूमामा भोळे (MLA Rajumama Bhole) हे देखील दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शिवराम पाटील, कॉ. अनिल नाटेकर, दिनेश भोळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता गिरणा टाकी परिसरातील चर्च समोर तीव्र आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत, महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) आणि नगरसेवक नितीन बरडे हे देखील त्या ठिकाणी पोहचले. दरम्यान, रस्त्यातील खड्डयांबाबत नागरिकांनी महापौरांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. तसेच लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा. अशी मागणी देखील संतप्त नागरिकांनी यावेळी केली.

दोन दिवसांत खड्डे बुजवणार

परिसरातील नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर त्याठिकाणी महापौर जयश्री महाजन यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. दरम्यान, येत्या दोन दिवसांत खड्डे बुजविण्यात येतील असे आश्वासनदेखील महापौरांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या