Friday, May 3, 2024
Homeनाशिक‘कवच कुंडल’ मोहिमेस नागरिकांचा प्रतिसाद

‘कवच कुंडल’ मोहिमेस नागरिकांचा प्रतिसाद

ठाणगाव । वार्ताहर Thangaon- Surgana

सुरगाणा तालुक्यात (surgana taluka) तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर (Health Officer Dr. Dilip Ranveer) व यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन कवच कुंडल’ (Mission Kavach Kundal) मोहिम राबविण्यात येत आहे.

- Advertisement -

त्या अनुषंगाने स्वामी विवेकानंद (swami vivekanand) उच्च माध्यमिक विद्यालय बार्‍हे येथे ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम कोवीड-19 (covid-19) लसीकरण शिबीर (vaccination camp) आयोजित केले होते. त्यात नागरिकांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद (good response) दिला.

यावेळी आरोग्य सेविका भारती मोरे (health worker bharti more), आशा सुपरवायझर मालती देशमुख, मिरा महाले, आशा कार्यकर्ती पारूबाई गुंबाडे, शालिनी दौंड, शितल महाले, अंगणवाडी कार्यकर्ती इंदुबाई गुंबाडे, पांडुरंग धुम तसेच बार्‍हे परिसरातील नागरिक उपस्थित होते. बार्‍हे परिसरातील नागरिक बाहेर कामानिमित्त गेले असल्याने त्यातच नागरिकांनी बाहेर ठिकाणी लस घेतल्याने बार्‍हे प्राथमिक आरोग्य केंद्राची कोवीड – 19 लसीकरण कामाची टक्केवारी ही 48 टक्केच दिसत आहे.

त्यामुळे नागरिकांनी कवच कुंडल मोहिमे अंतर्गत कुठेही लस घेतली तरी त्वरीत आपल्या बाऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा सुपरवायझर, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांना माहिती द्यावी. जास्तीत जास्त नागरिकांनी पहिला व दुसरा डोस (second dose) घ्यावा असे आवाहन डा.अपेक्षा जाधव यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र बार्‍हे अंतर्गत उपकेंद्र बाऱ्हे,ठाणगाव, कळमणे, आंबुपाडा (बे.), खोकरविहीर, आंबोडे, खिर्डी या उपकेंद्रातील गावात कोवीड लसीकरणाला सुरवात करण्यात आली आहे.

या मोहिमेत वंचित लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अपेक्षा जाधव यांनी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र बार्‍हे अंतर्गत येणार्‍या सर्व उपकेंद्राखालील गाव, खेडो – पाड्यात, वस्त्यांवरील लसीकरणापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना भेटून त्यांचे लसीकरण करून घेण्यात येत आहे.

याला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच चांगल्याप्रकारे लसीकरण पुर्ण होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डा.अपेक्षा जाधव यांनी दिली आहे. ही मोहिम यशस्वीतेसाठी डॉ. पाटील, डॉ. ठाकरे, आरोग्य सहाय्यक जगदिश सोनवणे, औषधनिर्माता तुषार चौधरी, शारदादेवी महाजन, आरोग्यसेविका मोहना पाडवी, शितल गोपाळे, साधना संसारे, भारती पालवी, सोनी भरसट, आरोग्यसेवक कपील जाधव, सचिन साबळे, प्रवीण ब्राम्हणे, नरेंद्र बागुल, आशा सुपरवायझर इंदुबाई पडेर, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, शिक्षक, मदतनीस आदी परिश्रम घेत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या