Friday, May 3, 2024
Homeनगरशहर, उपनगरात अवैध धंदे जोमात

शहर, उपनगरात अवैध धंदे जोमात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरासह उपनगरात (Suburb) अवैध दारू (Illegal Alcohol), जुगार (Gambling), मटका (Matka) या अवैध धंद्याचा (Illegal Bussiness) सुळसुळाट झाला आहे. अवैध धंदे खुलेआम सुरू असूनही पोलीस प्रशासनाचे हाताची घडी अन् तोंडावर बोट आहे. अवैध धंद्यावर कार्यवाही (Proceedings on illegal Bussiness) करण्यात यावी व अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी समाजवादी पार्टीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी दिले आहे.

- Advertisement -

शहरात काही महिन्यांपासून अवैध धंद्यांचा (Illegal Bussiness) मोठा सुळसुळाट सुरू आहे. शहरातील ठेल्यांवर, हॉटेलमध्ये बेकायदा अवैध दारू (Illegal illicit alcohol)राजरोसपणे सुरू आहेत. खुलेआम मटका आणि जुगार स्थानिक ठाणेदारांच्या आशिर्वादाने सुरूच असल्याचे चित्र आहे. पोलिस ठाण्यातीलच काही कर्मचार्‍यांचे या अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याची धडक चर्चा आहे.

अवैध धंदे रोखण्याची स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकार्‍यांचीही मानसिकता दिसून येत नाही. ते कानाडोळा करीत असल्याने येथील मटका (mataka), जुगार (Gambling), दारू (Alcohol) खुलेआम विक्री (Sales) सुरू झाल्याने येथे गुन्हेगारांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे स्थानिक शहरवासीयांकडुन पोलीस प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या