Thursday, June 11, 2026
Homeक्राईमAhilyanagar : शहर वाहतूक शाखेच्या पोलिसाला मारहाण

Ahilyanagar : शहर वाहतूक शाखेच्या पोलिसाला मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरात कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसावर दुचाकीस्वाराने हात उचलल्याची घटना समोर आली आहे. कायनेटीक चौकात रविवारी (1 मार्च) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस अंमलदार गणेश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. अजित बाळासाहेब भोगाडे (वय 22, रा. साकत, ता. आष्टी, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार शिंदे हे कायनेटीक चौकात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. यावेळी दोन दुचाकीस्वार रस्त्याच्या मधोमध वाहन उभी करून वाद घालत होते. यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. हा वाद सोडवण्यासाठी अंमलदार शिंदे यांनी मध्यस्थी केली असता, संशयित आरोपी अजित भोगाडे याने पोलिसांशी हुज्जत घातली. त्याने अंमलदार शिंदे यांची गचांडी धरून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित इतर कर्मचार्‍यांनी तात्काळ धाव घेत अंमलदार शिंदे यांची सुटका केली. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी मदतीला आले. त्यांनी संशयित आरोपी भोगाडे याला ताब्यात घेतले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भोगाडे याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...