Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसेन्सेक्स-निफ्टीवर संकटाचे ढग; चार दिवसांत 'इतक्या' लाख कोटींचा फटका, जाणून घ्या पडझडीमागची...

सेन्सेक्स-निफ्टीवर संकटाचे ढग; चार दिवसांत ‘इतक्या’ लाख कोटींचा फटका, जाणून घ्या पडझडीमागची कारणं

मुंबई | Mumbai
भारतीय शेअर बाजारात गेल्या काही सत्रांपासून सुरू असलेली विक्री मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजीही कायम राहिली. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिका-इराणमधील तणाव, अमेरिकेतील वाढते बाँड यिल्ड, रुपयाची घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री या घटकांचा बाजारावर दबाव आहे. २४ सप्टेंबरच्या बुधवारच्या बंद पातळीपासून मंगळवारच्या व्यवहारात बीएसईवरील एकूण बाजार भांडवलात सुमारे १४ लाख कोटी रुपयांची घट झाली, अशी बाजारातील आकडेवारीवरून दिसते.

मात्र, ‘14 लाख कोटी बुडाले’ म्हणजे ही रक्कम थेट गुंतवणूकदारांच्या खात्यातून निघून गेली असा अर्थ नाही. शेअर्सच्या बाजारभावात झालेल्या घसरणीमुळे कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य कमी झाले आहे.

- Advertisement -

सेन्सेक्समध्ये मोठी घसरण
२४ सप्टेंबरला सेन्सेक्स १,२४७.७१ अंकांनी घसरून ७३,५८०.५४ वर बंद झाला होता. त्या दिवशी बीएसईवरील सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल सुमारे ₹४८१.४७ लाख कोटी झाले होते; आदल्या दिवसाच्या ₹४८५.०१ लाख कोटींच्या तुलनेत एका दिवसात सुमारे ₹३.५४ लाख कोटींची घट झाली.

त्यानंतर शुक्रवारी बाजारात काहीशी सुधारणा झाली. मात्र सोमवारी पुन्हा जोरदार विक्री झाली. २८ सप्टेंबरला सेन्सेक्स १,१२४.०२ अंकांनी घसरून ७२७७१.७२ वर, तर निफ्टी ३६०.२५ अंकांनी घसरून २२,७८०.२५ वर बंद झाला. या एका दिवसात बीएसईवरील कंपन्यांच्या बाजारमूल्यात सुमारे ₹७.४ ते ₹८ लाख कोटींची घट झाली.

मंगळवारीही सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ७०० अंकांपर्यंत घसरला, तर निफ्टी २२,६०० च्या खाली गेला. काही वेळातच बीएसईच्या बाजार भांडवलातून आणखी सुमारे ₹४ लाख कोटींची घट झाल्याचे सांगितले जात आहे.

बाजार का कोसळतोय? जाणून घ्या प्रमुख कारणं
कच्चा तेलाच्या दरात झालेली वाढ, अमेरिकन बॉण्ड यील्डमधील तेजी आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्री सुरु असल्यानं शेअऱ बाजारात घसरण होत आहे.

क्रूड ऑईलच्या दरात वाढ
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढला आहे, ट्रम्प यांनी इराणचे प्रस्ताव फेटाळले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन दोन्ही देशात संघर्ष सुरु आहे. यामुळं कच्चा तेलाच्या दरात वाढ झाली आहे. इराणचा प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळल्यानं तेलपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारत जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. यामुळं क्रूड ऑईलच्या दरात वाढ झाल्यानं शेअर बाजारावरील दबाव वाढला आहे. क्रूड ऑईलचे दर 107 डॉलर प्रति औंसवर गेले आहेत.

अमेरिका-इराण तणावामुळे गुंतवणूकदारांची चिंता
अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होण्याच्या अपेक्षांना धक्का बसल्याने बाजारातील अनिश्चितता वाढली आहे. इराणच्या प्रस्तावावरून निर्माण झालेल्या तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे तेलाच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची भीती बाजारात निर्माण झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना चिंतेत टाकत आहे.

राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय! ‘माजी अग्निवीरांना’ शासकीय नोकरीत १०% आरक्षण, वैरण धोरणासह लॉजिस्टिक्स क्षेत्रात महत्त्वाच्या सुधारणा

अमेरिकेतील बाँड यिल्डमध्ये वाढ
अमेरिकेच्या १० वर्षांच्या ट्रेझरी यिल्डमध्ये मोठी वाढ झाली आहे. २९ सप्टेंबरच्या अहवालांनुसार ते ५.२ टक्क्यांपेक्षा वर गेले असून, ही पातळी अनेक वर्षांतील उच्च स्तरांपैकी एक आहे. याचा भारतासारख्या उदयोन्मुख बाजारांवर परिणाम होतो. अमेरिकी सरकारी रोख्यांमधून तुलनेने आकर्षक परतावा मिळत असल्यास जागतिक गुंतवणूकदार काही पैसा जोखमीच्या शेअर बाजारातून काढून अमेरिकी बाँडमध्ये वळवू शकतात. त्यामुळे भारतीय बाजारात FII विक्रीचा दबाव वाढू शकतो.

परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर विक्री
२८ सप्टेंबरला विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय शेअर बाजारात तब्बल ₹5,353.22 कोटींची निव्वळ विक्री केली. सप्टेंबरमधील हा त्यांचा एका दिवसातील सर्वात मोठा आउटफ्लो ठरला. सप्टेंबरमध्ये १९ पैकी १४ ट्रेडिंग सत्रांत FII निव्वळ विक्रेते राहिले असून, महिन्यातील त्यांची एकूण निव्वळ विक्री सुमारे ₹23,885 कोटी झाली आहे. FII विक्री वाढली की मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सवर थेट दबाव निर्माण होतो आणि त्याचा परिणाम सेन्सेक्स-निफ्टीवर होतो.

रुपया 96 रुपयांच्या आसपास
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि डॉलरची मजबुती यामुळे रुपयावरही दबाव आहे. २८ सप्टेंबरला रुपया डॉलरच्या तुलनेत 95.9825 वर बंद झाला. तेलाच्या किमती वाढल्यास भारताला तेलासाठी अधिक डॉलर खर्च करावे लागतात. त्यामुळे रुपयावर आणखी दबाव येऊ शकतो. कमकुवत रुपया हा परदेशी गुंतवणूकदारांसाठीही चिंतेचा विषय असतो, कारण त्यांच्या गुंतवणुकीवरील डॉलरमधील परताव्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

RBIच्या व्याजदरांबाबत चिंता
कच्चे तेल महाग झाल्याने महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात RBIच्या व्याजदर धोरणाबाबत अनिश्चितता वाढली आहे. बाजारातील काही अर्थतज्ज्ञांना पुढील पतधोरण बैठकीत व्याजदर वाढण्याची शक्यता वाटत असल्याचे अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. व्याजदर वाढल्यास कर्जाचा खर्च वाढू शकतो आणि कंपन्यांच्या नफ्यावर दबाव येऊ शकतो.

जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरण
भारतीय बाजाराची दिशा केवळ देशांतर्गत परिस्थितीवर अवलंबून नसते. अमेरिकेतील बाँड बाजार, कच्चे तेल, डॉलर, पश्चिम आशियातील संघर्ष आणि इतर आशियाई बाजारांमधील हालचाली यांचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम होतो. 29 सप्टेंबरला भारतातील 16 प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी 14 निर्देशांक घसरणीत होते. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही सुमारे 0.8 टक्क्यांनी घसरले. त्यामुळे ही घसरण केवळ काही मोजक्या मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित नसल्याचे दिसून आले.

कोणत्या शेअर्सना सर्वाधिक फटका?
२९ सप्टेंबरच्या सुरुवातीच्या व्यवहारात टाटा मोटर्स, टाटा इन्व्हेस्टमेंट, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. टाटा मोटर्समध्ये सुमारे 3 टक्के, तर टाटा इन्व्हेस्टमेंटमध्ये सुमारे 2.5 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. मंगळवारीही जवळपास संपूर्ण बाजार लाल रंगात होता. सेन्सेक्समधील ३० पैकी २९ कंपन्यांचे शेअर्स घसरणीत बंद झाले, तर केवळ इन्फोसिसमध्ये किरकोळ वाढ झाली.

ताज्या बातम्या